Tuesday, November 10, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar Simhastha News : मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वरला पालकमंत्री महाजनांच्या हस्ते विधिवत ध्वजस्तंभ...

Trimbakeshwar Simhastha News : मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वरला पालकमंत्री महाजनांच्या हस्ते विधिवत ध्वजस्तंभ पूजन

कामे वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुशावर्त तीर्थ येथे आज सकाळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चाराच्या घोषात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, विविध कामांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांची निर्धारित वेळेत पूर्तता यांना प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रपती महोदयांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री महाजन यांनी यावेळी केले.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbhmela) आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि विविध विभागांमधील समन्वय या बाबी महत्त्वाच्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नियोजनानुसार कामांना गती देण्यावर भर दिला जात आला. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या सोहळ्याच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमधील नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या पूजन सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सहायक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी सानप,
मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजस्तंभाची माहिती

ध्वजस्तंभाची उंची ३१ फूट आहे. समुद्र मंथनाची संकल्पना ध्वजस्तंभावर साकारण्यात आली आहे. मंथनातून प्राप्त रत्ने ध्वजावर आहेत. खालील भागात श्री गणेशाची प्रतिमा साकारली आहे. सर्वात वरील भागात अमृत कलश धारी गरुडाची प्रतिमा आहे. हा आकर्षक व भव्य ध्वजस्तंभ पाहून उपस्थित भाविक भक्तीभावाने नतमस्तक होणार आहेत. दरम्यान गंगा आरतीने ध्वजस्तंभ पूजन सोहळ्याची सांगता झाली.

व्यापक स्वच्छता आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त

कुंभमेळा ध्वजस्तंभ प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थ परिसरात विशेष व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुशावर्तच्या पाठीमागील बाजूच्या छोट्या पश्चिम दरवाजातून मंत्री महाजन आणि मान्यवरांचे आगमन झाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...