Thursday, April 23, 2026
Homeक्राईमNashik News : उद्धव निमसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; न्यायालयाने दिली...

Nashik News : उद्धव निमसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; न्यायालयाने दिली परवानगी

जामीनावर सोमवारी सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खुनाच्या गुन्ह्यात (Murder Case) कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव निमसे (Uddhav Nimse) यांना तुरुंगातूनच महापालिकेच्या नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यास जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (दि. २६) परवानगी दिली आहे. तर, त्यांच्या जामिनावरील सुनावणी आता २९ डिसेंबरपर्यंत लांबली आहे. त्यामुळे निमसे व त्यांचे समर्थक आता काय व कसा निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असून निमसेंच्या जामिनास धोत्रे गटासह वकिलाने कडाडून विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

राहुल संजय धोत्रे यांच्या खुनाप्रकरणी कारागृहात (Jail) असलेले उद्धव निमसे जामिनासाठीही प्रयत्नशील आहेत. त्यांनी ७नोव्हेंबर रोजी जामीन अर्ज दाखल केला असून, १४ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (दि. २३) अर्जावर युक्तिवाद झाला असता, धोत्रे गटातर्फे थेट न्यायाधीशांवर आक्षेप नोंदविण्यात आला. हे प्रकरण प्रधान मुख्य न्यायाधीशांपर्यंत गेल्यानंतर बुधवारी (दि. २४) पुन्हा सुनावणी झाली.

दरम्यान, संबंधित न्यायालयाने पुढील निर्णयासाठी प्रधान मुख्य न्यायाधीशांकडे (Judge) विनंती केली. त्यानुसार, निमसे यांना कारागृहातून महापालिका निवडणूक लढविण्यास परवानगी द्यावी, या मुद्द्यावर शुक्रवारी (दि. २६) सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायाधिशांनी निमसे यांना कारागृहातूनच निवडणूक लढविण्यास परवानगी ‘ग्रान्ट’ केल्याचे अॅड. मनोज पिंगळे यांनी सांगितले.

पाटीलही लटकले

गोळीबीरासह खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या जामीन अर्जावरही शुक्रवारी (दि. २६) निर्णय होणार होता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर २९ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे जगदीश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : पाच वाजेपर्यंत ‘एवढे’ टक्के मतदान

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri बहुचर्चित राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Rahuri Assembly By Election) आज गुरुवारी (23 एप्रिल) मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणीही माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्याविषयीची संदिग्धता...