Saturday, April 25, 2026
HomeनाशिकNashik News : अवयवदान करून कीर्तीरूपे उरावे; नाशिकमध्ये ४ हजार ५१ जणांनी...

Nashik News : अवयवदान करून कीर्तीरूपे उरावे; नाशिकमध्ये ४ हजार ५१ जणांनी घेतली प्रतिज्ञा

नाशिक | विजय गिते | Nashik

अवयवदानाचे (Donate Organs) महत्त्व अधोरेखित करणारी ‘अवयव दान करून कीर्तीरूपे उरावे’ ही चळवळ जिल्ह्यात (District) यशस्वीपणे राबवली जात आहे. आरोग्य विभागाच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या पंधरवड्याला अवयवदान नाशिककर (Nashik) भरभरून प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत ४,०५१ व्यक्तींनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली असून, यामध्ये ३० ते ४५ वयोगटातील व्यक्तींचा समावेश सर्वाधिक आहे.

- Advertisement -

विशेषतः ५ ते ८ ऑगस्टदरम्यान नोंदणीमध्ये ८० ते ९० टक्के वाढ झाली आहे. या चळवळीच्या यशस्वीतेचा सन्मान म्हणून १५ ऑगस्ट रोजी जिल्हा व तालुका स्तरावर अवयव दात्यांचा सत्कार होणार आहे. नोंदणीमध्ये पुरुषांचा सहभाग अधिक आहे. यामध्ये हृद्य (२,९००), यकृत (२,८८८) आणि फुफ्फुसे (२,५८८) यांसारख्या अवयवासह त्वचा (२,३३२), हाड (२,२६३) आणि रक्तवाहिन्या (२,१८२) यांच्या दानाला प्राधान्य दिले जात आहे. अवयव दानामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण ६५ हजार ९८९ नोंदणीसह राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये नाशिकचा वाटा महत्त्वपूर्ण आहे.

देशात महाराष्ट्र द्वितीय

अवयव दानामध्ये महाराष्ट्र हा द्वितीय क्रमांकावर असून पहिल्या पाच राज्यांमध्ये (State) राजस्थानमधून ९०,०११, महाराष्ट्र ६५,९८९, कर्नाटक ४४,६०७, गुजरात ३९२२८, मध्य प्रदेश २३,७४४ इतक्या लोकांनी अवयव दानाची प्रतिज्ञा केली आहे.

जिल्ह्यातून अशी आहे नोंदणी

हार्ट (२९००), आतडे (२४२८), मूत्रपिंड (९८६), यकृत (२०१८), स्वादुपिंड (२४२१), रक्तवाहिन्या (२२,१८२), हाड (२२६३), बोन (२२२०), कॉर्निया (७१९), हार्ट व्हॉल्व (६२६), स्कीन (२३२).

नोंदणीत ३०-४५ वयोगट आघाडीवर

३० दिवसांतील ट्रेंडमध्ये नोंदणीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विशेषतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून ५ ते ८ ऑगस्ट याकाळात ८० ते ९० टक्क्यांपर्यंत ही नोंदणी झालेली आहे. नोंदणी करणाऱ्यांमध्ये ३०-४५ वयोगटातील वर्ग सर्वात मोठा आहे. बहुतेक प्रतिज्ञा अवयवांसाठी असतात, त्यानंतर ऊती असतात आणि नंतर अवयव आणि ऊती दोन्ही असतात. यामध्ये हृदय (२९००), यकृत (२८८८) आणि फुफ्फुसे (२५८८) हे सर्वात जास्त तारण असलेले अवयव आहेत. याबरोबरच त्वचा (२३३२), हाडं (२२६३) आणि रक्तवाहिन्या (२१८२) यांचे प्रमाण अधिक आहे.

पुढील जन्म अवयवांविना होईल!

स्व. डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या प्रेरणेने २००३ पासून उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेल्या या चळवळीला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, अवयव दानाची गरज आणि महत्त्व समजल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. समाजात अवयव दानाबाबत अंधश्रद्धा आणि गैरसमज, जसे की पुढील जन्मात अवयवांविना जन्म होईल का? अशी भीती, प्रचलित आहे. यासाठी जनजागृती केली जात आहे. या प्रयत्नांना आता यश मिळत असून, भविष्यातही ही चळवळ अशीच पुढे जाईल. अव्यव दानामुळे अनेकांचे जीव वाचत असल्याने प्रत्येकाने याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

प्रा. अशोक सोनवणे

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...