Friday, April 24, 2026
HomeनाशिकNashik News : चौक मंडई भागात जुना वाडा कोसळला; चार दुचाकी, एक...

Nashik News : चौक मंडई भागात जुना वाडा कोसळला; चार दुचाकी, एक रिक्षा दबली

नाशिक | Nashik

शहरातील चौक मंडई (Chowk Mandai) भागातील वजरे कॉम्प्लेक्सच्या मागे बंद असलेला एक जुना वाडा आज (मंगळवारी) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून, वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage) झाले आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती देतांना महापालिका पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी सांगितले की, चौक मंडई भागातील वाडा नंबर ३१४३ हे पूर्वीपासून धोकादायक होते. या घराला अनेकवेळा धोकादायक म्हणून नगररचना विभागामार्फत (Town Planning Department) नोटीस बजावली होती. परंतु,सदर वाडामालकाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती.

त्यानंतर आज दुपारच्या सुमारास हा वाडा पडला. या वाड्याखाली सुमारे चार दुचाकी व एक रिक्षा दबली गेली” अशी माहिती त्यांनी दिली. चौक मंडईतील जेवढी धोकादायक घरे आहेत त्यांना दरवर्षी पावसाळ्यात (Rainy Season) नोटीसा बजावत असतो”,असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या