Sunday, April 12, 2026
HomeराजकीयNashik News : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी; सरकारविरोधात घोषणाबाजी

Nashik News : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी; सरकारविरोधात घोषणाबाजी

नाशिक | Nashik

राज्य सरकारने (State Government) इयत्ता पहिलीपासून शालेय शिक्षणात हिंदी भाषा (Hindi Language) सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलैला हिंदीसक्तीच्या विरोधात मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, त्याआधी आज (रविवार) राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाकडून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

- Advertisement -

नाशिकमध्ये (Nashik) देखील ठाकरेंच्या शिवसेनेने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालीमार येथील पुतळ्याजवळ हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा देखील यावेळी शिवसैनिकांकडून (Shivsainik) निषेध करण्यात आला.तसेच भाषेला विरोध नाही पण मराठीवर अन्याय नको, हिंदी सक्ती बंद करा, महाराष्ट्र वाचवा, मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, राज्य सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी, महानगरप्रमुख मामा राजवाडे, माजी आमदार वंसत गीते, उपनेते दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी महापौर यतीन वाघ, विनायक पांडे, बाळासाहेब पाठक, राजेंद्र काजळे, किरण डहाळे, चंदू महानुभाव, राजूभाऊ मोरे, प्रथमेश गीते, तृप्ती निरगुडे, स्वाती पाटील, श्रद्धा कोतवाल, शोभा दिवे यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : परिचारिकेची रुग्णालयात आत्महत्या

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील एका नामांकित रुग्णालयात (Hospital) शिकाऊ परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)...