Sunday, September 6, 2026
Homeक्राईम​Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

​Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

समाजाच्या सुरक्षिततेसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या एका ‘खाकी’ वर्दीतील सेवकाचा कर्तव्यावर असतानाच मृत्यु (Death) झाला. अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) कार्यरत असलेले होमगार्ड संतोष त्र्यंबक शेलार (वय ४२) यांचा बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ‘ऑन ड्युटी’ असतानाच काळाने झडप घातल्याने पोलिस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​सिडकोतील (Cidco) उत्तमनगर येथे राहणारे संतोष शेलार १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अंबड पोलिस ठाण्यात हजर होते. दिवसभर उत्साहात ड्युटी केल्यानंतर, सायंकाळी ४:३० च्या सुमारास अधिकारी बॅरेकजवळील पार्किंगमध्ये उभे असताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना त्रास होताच सहकारी होमगार्ड जगताप यांनी तातडीने मदतीचा हात दिला.

विलंब न लावता त्यांना शासकीय वाहनातून प्रथम ‘लाईफकेअर हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत अंबड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस (Police) शिपाई संदीप डावरे या अधिक तपास करत आहेत. ऐन चाळीशीत कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने शेलार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...