Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकNashik Simhastha News : सिंहस्थ ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह...

Nashik Simhastha News : सिंहस्थ ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी

पुरातत्वची कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी आज (दि.२१) रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

कुशावर्त तीर्थ व मंदिर परिसराची पायी पाहणी

आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, मेन रोड आणि गोदावरी कुशावर्त तीर्थ क्षेत्राची पायी फिरून पाहणी केली. ध्वजारोहणासाठी विशेष स्टँड उभारण्यात आले असून, मुख्य सोहळ्यासाठीचे व्यासपीठ (स्टेज), मान्यवर व साधू-संतांच्या बैठकीची व्यवस्था याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात (Trimbakeshwar Temple Area) जुन्या दगडी फरश्या काढण्याचे काम सध्या सुरू असून, कुशावर्त तीर्थ परिसरातही संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे अनुक्रमे केंद्रीय व राज्य पुरातत्त्व खात्यामार्फत केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, ऐतिहासिक व प्राचीन ठेवा अबाधित राखून सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करा, अशा कडक सूचना आयुक्तांनी राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रतिनिधींना दिल्या.

विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यादरम्यान त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी गोविंद जाधव, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त शुक्ल, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, पोलीस निरीक्षक मयूर चौधरी यांच्यासह नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांना अमृतस्नान व शाही मिरवणूक सुलभ दिसणार?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. असे असले तरी, कुंभमेळ्यादरम्यान होणारे अमृतस्नान, पर्वणी आणि नागा साधूंसह विविध आखाड्यांच्या देवतांची निघणारी भव्य शाही मिरवणूक भाविकांना सहजरित्या पाहता यावी, यासाठी विशेष नियोजनाची मागणी जोर धरत आहे. भाविकांना मिरवणूक पाहण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बिनविरोधसाठी नेत्यांची पुन्हा एकी, कार्यकर्त्यांचे काय?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी आज बुधवार (दि.21) रोजी शेवटची मुदत आहे. तत्पूर्वी मंगळवारी दसर्‍याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येत...