Saturday, August 29, 2026
HomeनाशिकNashik Simhastha News : सिंहस्थ पूर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार -...

Nashik Simhastha News : सिंहस्थ पूर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर सुरूच राहणार – कुंभमेळा आयुक्त सिंह

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) बंद ठेवले जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कुंभमेळा पूर्व काळात त्र्यंबकेश्वर मंदिर नियमितपणे सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी पत्राद्वारे दिले आहे.

साधू-संत व आखाड्यांच्या परंपरा अखंडित राहणार

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या परंपरेनुसार श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन साधू-संत व आखाड्यांच्या प्रचलित धार्मिक परंपरेनुसारच होईल. सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक परंपरांशी अतूटपणे जोडलेला असल्याने त्यांच्या विधींवर किंवा दर्शनावर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. मंदिर बंद ठेवून साधू-संतांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा प्राधिकरणाचा कोणताही विचार किंवा निर्णय झालेला नाही, असे पत्रात (Letter) नमूद केले आहे.

नियोजनाचा मुख्य उद्देश आणि गर्दीचे आव्हान

सध्याच्या उपलब्ध व्यवस्थेनुसार दररोज सुमारे २०,००० ते २५,००० भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी लाखो भाविक दाखल होणार असल्याने सुरक्षेचे आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. पत्रकार परिषदेत केवळ भाविकांच्या सुरक्षेच्या व शास्त्रीय गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजनात्मक मुद्दे मांडण्यात आले होते; मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,असेही पत्रात म्हटले आहे.

सर्व घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय

धार्मिक परंपरा आणि भाविकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा समतोल राखत नियोजन केले जात आहे. देवस्थान, साधू-संत, आखाडे, सर्व प्रशासकीय घटक तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी सविस्तर विचारविनिमय करूनच अंतिम दर्शन व्यवस्था ठरवण्यात येईल, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने नाशिकला आले म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिकच्या...