Thursday, May 2, 2024
Homeनाशिकइंडियन मेडिकल असोसिएशनचे आवाहन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे आवाहन

नाशिक ।  प्रतिनिधी

फक्त गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी घेऊन जावे. इतर इमर्जन्सी नसलेल्या आजारांचे उपचार व नियमित तपासणी काही आठवड्याकरिता पुढे ढकलावी. तसेच रुग्णांनी जास्त दिवसांची औषधे घेऊन रुग्णालयात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

आजारी रुग्णाला बघण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी करू नये, तसेच एका रूग्णा बरोबर एकाच नातेवाईकाने जवळ थांबावे,अशी विनंती करण्यात आली आहे.लहान मुले व वयस्कर मंडळीनी विशेष काळजी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे. करोना विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी ही उपाययोजना असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोनानिस व खजिनदार डॉ.किरण शिंदे व इतर पदाधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले.

नागरिकांनी पुढील काही काळ सामूहिक गर्दी टाळली तर भारतातील ह्या आजाराचा धोका टळू शकतो,असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सनिटायझर्स वापरणे, काही लक्षणे दिसल्यास तज्ञ डॉक्टरांना भेटणे इत्यादी योग्य वेळी केल्यास करोणा चा धोका टळू शकतो असेही त्यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स व रुग्णलयांमध्ये असणारे कर्मचारी नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर असतील व सरकारला सर्व प्रकारे सहाय्य केले जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या