Friday, July 3, 2026
Homeनाशिकगंजमाळ – भीमवाडी येथील आगीतील नुकसान ग्रस्तांसाठी प्रति परिवार एक लाख रुपये...

गंजमाळ – भीमवाडी येथील आगीतील नुकसान ग्रस्तांसाठी प्रति परिवार एक लाख रुपये मदत द्यावी – आ. देवयानी फरांदे

नाशिक । प्रतिनिधी

२४ एप्रिल २०२० रोजी नाशिक येथील झोपडपट्टीला आग लागून त्यांचे नुकसान झालेले होते या ११६ परिवारातील सहाशे नागरिक हे झोपडी पूर्ण जळाल्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आहे या ११६ परिवारांना एक लाख रुपये प्रति परिवार मदत देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

आज या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात झोपडपट्टी ही १९८४ पासून नाशिक महानगरपालिकेच्या जागेवर वसलेले असून दिनांक २४.०४.२०२० रोजी अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करताना यापूर्वी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची विनंती आपण मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्याकडे केली असल्याची बाब नमूद करताना गेल्या दहा दिवसात शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याबाबत खेद व्यक्त करताना सदर परिवारांना मूलभूत सुविधा पूर्ण करताना देखील अडचणी निर्माण होत असल्याची बाब मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच सध्याचा करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वचक सोशल डिस्टन्स इन चे पालन करणे देखील अशक्त झाल्याची बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे गंजमाळ येथील भिमवाडी झोपडपट्टीला आग लागून झालेल्या नुकसानीसाठी प्रति परिवार एक लाख रुपये देण्याची मागणी आमदार फरांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...