Friday, July 3, 2026
Homeनाशिकखरीप हंगामासाठी जमीन मशागतीच्या कामांना वेग

खरीप हंगामासाठी जमीन मशागतीच्या कामांना वेग

येवला । प्रतिनिधी

येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामासाठी जमीन मशागतीच्या कामांना वेग आला आहे . आज मृग नक्षत्र लागणार असल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतिक्षा करत आहेत. खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते आदींची जमवा जमव शेतकरीवर्ग करीत आहे  मृगाच्या नक्षत्रात वरून राजांचे आगमन चांगले होईल असंही अपेक्षा शेतकरी वर्ग करित आहे.एक दोन दिवसात पाऊस झाला तर पेरणीच्या कामाला सुरुवात होईल.काही ज्यांचे कडे शेततळ्यात पाणी साठा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीस सुरवात केली आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजीसह नातवाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी...