नाशिक । प्रतिनिधी
देशात आणि राज्यात करोनाचे मोठे संकट निर्माण झाले असून अधिकाधिक नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करोनाबाबत जन जागृतीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रयत्न करावे असे आवाहन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, महेश भामरे, निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, मुक्तार शेख, सेवादल शहराध्यक्ष बाळासाहेब मते, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने, कार्याध्यक्ष अँड.चिन्मय गाढे, धनंजय निकाळे, शंकर पिंगळे, वकील सेल जिल्हाध्यक्ष अँड.शरद गायधनी, संजय खैरनार, अनिल परदेशी, बाळासाहेब गिते, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, राजेंद्र शेळके, सायरा शेख, संदीप अहिरे, नाना पवार, नवराज रामराजे, राहुल कमानकर, रविंद्र शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या स्थापनेला आज २१ वर्ष पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवत सुरक्षित अंतर राखत देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन साजरा होत आहे. तर एकीकडे जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार हे आज कोकण येथे पाहणी दौरा करत आहे. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य आपणा सर्वांचे असून या संकट काळात सर्वांनी सामाजिक भान ठेवत काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पगार यांनी पक्षाच्या २१ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत पक्षाच्या पहिल्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ना.छगन भुजबळ यांच्यावर आली. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत केलेल्या कामांबाबत उजाळा दिला. यावेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले नाशिक लोकसभा जिल्हाअध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. तर शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.




