इंदिरानगर | वार्ताहर
प्रभाग ३० मधील वडाळागावात काेराेनाचे रुग्ण सापडल्यानंतर त्वरित मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परिसरात भेट देउन नागरिकांशी संपर्क साधून समुपदेशन केले.
- Advertisement -
नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मनपा स्थायी समिती सदस्या सुप्रिया खोडे यांनी त्वरित के.बी.एच. शाळा येथे दि.२२ मे राेजि पासुन ते दि.१जूनपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
रुग्णांना मोफत औषधे वाटप केली जाणार आहे. या शिबिरास मनपा आयुक्त गमे व मनपा आरोग्य विभागीय वैदयकीय अधिकारि डॉ.पावसकर मनपा आरोग्य सभापती दीपाली कुलकर्णी व स्थानिक नगरसेवक यांनी भेट देऊन शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन केले आहे.
शिबिर यशस्वितेकरिता डॉ. ब्रिजभूषण महाजन,डॉ. नरसिंग माने,डॉ. जानकी माने माजि नगरसेवक सुनिल खाेडे यानी विशेष परिश्रम घेत आहे.




