Friday, July 3, 2026
Homeनाशिककळवण शहरात करोनाचा शिरकाव

कळवण शहरात करोनाचा शिरकाव

सर्व पक्षीय पदाधिकार्याचे तहसिलदार यांना निवेदन , तालुक्यात १७ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यु’

पुनदखोरे । वार्ताहर

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात करोनाच्या प्रार्दुभाव वाढत असताना काल दि.१२ मे रोजी कळवण शहरात एका ११ वर्षाच्या बालकाचा अहवाल करोणा पॉझीटीव्ह आल्याने संपुर्ण शहरात भितीचे वातावरण पसरल्याने शहरात ४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकारी व्यापारी संघटना यांनी केले .

या विषाणू ची करोना साखळी तोडण्यासाठी व खेड्यापाड्यात सदर आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १७ मे पर्यन्त संपुर्ण तालुक्यात शहर व खेडोपाडी,वाडीवस्ती सह जनता कर्फ्यु ची मागणी कळवण चे तहसीलदार बंडू कापसे यांचे कडे करुन तहसिलदारांनी तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश सर्व प्रशासकीय यंत्रनेला दिलेत. तसेच सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी कळवण तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेवुन कडक अंमलबजावणी साठी चर्चा केली.

कळवण तालुक्यात जनता कर्फ्यु मध्ये आजपासून पुढील चार दिवस मेडीकल सुविधा वगळता लॉक डाऊन सक्तिने पाळावे. सदर करोना कळवण शहरात पोहचला असुन आपल्या गावापर्यंत व आपल्या घरापर्यंत पोहचु नये, यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन घराबाहेर पडणे टाळावे. अन्यथा प्रशासकीय यंत्रणा कडक कार्यवाही करेल. म्हणुन आपला तालुका ,आपला गाव,आपले कुंटुब या महारोगापासुन वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे कळवण तालुका सर्व पक्षिय पदाधिकारी , लोकप्रतीनिधी व प्रशासकीय अधिकारींनी असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजीसह नातवाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी...