Friday, July 3, 2026
Homeनाशिकपाठ्यपुस्तकांचा पीडीएफ प्रकाशन सोहळा संपन्न

पाठ्यपुस्तकांचा पीडीएफ प्रकाशन सोहळा संपन्न

नाशिक । प्रतिनिधी

MTS अर्थात महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या ब्लॉगचा उद्घाटन सोहळा व ई बालभारती इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचे स्मार्ट फ्लिपबुक पीडीएफचा प्रकाशन सोहळा ऑनलाईन संपन्न झाला .

- Advertisement -

MTS निर्मित स्मार्ट फ्लिपबुक्स pdf प्रकाशन आणि ब्लॉग उदघाटन सोहळ्यात मनीषा वर्मा ,प्रधान सचिव, आदिवासी विकास महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जयश्री राऊत सहा.सचिव,अमरावती. मंजुषा क्षीरसागर, प्राचार्य, डायट, जळगाव. .सुलोचना पटारे, गटशिक्षणाधिकारी, राहुरी. प्रतिभा भराडे, शिक्षण विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा. आनंदी निळकंठ जंगम, पदवीधर शिक्षिका, मनपा,पिंपरी चिंचवड. यांच्या प्रमुख उपस्थिती नेत्रदीपक सोहळा ऑनलाईन पार पडला.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी,विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे हा उदात्त हेतू ठेऊन MTS या ग्रुपची निर्मिती करण्यात आली असून आज लॉकडाऊन काळात समूहाच्या वतीने संपूर्ण राज्याला ऑनलाईन अभ्यासक्रम घेणे सोयीचे व्हावे या उद्देशाने तसेच विद्यार्थी,शिक्षक व पालकांना एक क्लिकवर व एका पेजवर वर्ग १ ते १२ वी चा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचप्रमाणे लाखो रुपयांचा शैक्षणिक डेटा मोफत http://www.mtssamuh.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध करून दिला आहे .

अत्याधुनिक शैक्षणिक प्रणालीचा वापर ग्रामीण व दुर्गम भागात ग्रुप च्या माध्यमातून सुरू आहे,वेळोवेळी शिक्षकांचा फिडबॅक घेऊन त्यांच्या तांत्रिक व शैक्षणिक अडचणी विषयानुसार ग्रुपच्या एक्सपर्ट कडून सोडविल्या जातात त्यामुळेच आज ३५००० सदस्य ग्रुपला जॉईन झाले असून दररोज नवनवीन ज्ञानवर्धक माहिती समूहाद्वारे पुरवण्यात येते, शिक्षकांना नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी ग्रुप ने शिक्षकांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविले जातात साप्ताहिक नियोजन तयार करून समूहाचे शिस्तबद्ध काम चालते,त्यात सर्वांच्या मताचा आदर करून कोअर टीम निर्णय घेत असते त्या मुळे लोकशाही मार्गाने चालणारा राज्यातील एकमेव समूह म्हणून MTS समूहासोबत शिक्षकांचे व अधिकारी वर्गाचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.

समुहाचे राज्य समन्वयक भालचंद्र भोळे, समाधान आहिरे, सुनील कुमार बडगुजर, ओंकार भोई, अलंकार वारघडे, नितीन गुंजाळ, संजय राठोड, क्रांती महिरे ,कल्पना सुपेकर, राणा चौधरी , महेश पराड,दीपक कोळी, राजेंद्र कासार, सुनील हटवार, दत्ता लोकरे, निशाल विधाते यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

ऑनलाईन सोहळ्यासाठी समुहाची महिला ब्रिगेड म्हणजेच क्रांती महिरे,कल्पना सुपेकर,वैशाली शिंदे,शारदा चौधरी, मंगला अळसपुरे, सुनिता लहाने,कुमुद नेहते, माधुरी पाटील,वैशाली सावंत, माधवी नेरकर, सारिका अचमे ,गायत्री नेमाडे यांनी विशेष मेहनत घेतली तर ई-बालभारती (इ.पहिली ते बारावी) स्मार्ट फ्लिपबुक निर्मितीसाठी भालचंद्र भोळे, ओंकार भोई, सुनील बडगुजर, नितीन गुंजाळ, संजय राठोड, क्रांती महिरे,महेश पराड, समाधान अहिरे,निशाल विधाते यांनी विशेष मेहनत घेतली.

https://tinyurl.com/MTS-Marathi या लिंकवर मराठी माध्यमांसाठी स्मार्ट फ्लिपबुक उपलब्ध आहे. तसेच इंग्रजी माध्यमांसाठी https://tinyurl.com/MTS-English-medium लिंक सर्वांसाठी उपलब्ध आहे.एकाच वेळी फेसबुक , टेलिग्राम व whats app च्या ८८ ग्रुपमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

सदर ऑनलाईन कार्यक्रमासाठी श्री.विजय आगम,.शारदा चौधरी बाळासाहेब बारवेकर,किरण हिवराळे, सदाशिव अत्तरकार, सुधाकर आडे,प्रभाकर गढरी, गोवर्धन शिंदे, नरहरी निकाडे ,स्पृहा सुरेश इंदु, धुळे सर, अनिल शिनकर, राजकुमार यादव,.कुमूद नेहते,विशाल पाटील ,प्रमोद पोतदार,राजेंद्र शिंदे ,किशोर सिरसाठ,सचिन कोकणे,सुधिर फडके,अशोक लांडगे,प्रसाद नांगरे,निहाळ सर,प्रमिला तनपुरे,नयना बंगाळ,विजयसिंग शिंदे अजय पाटील,गायकर सर ,सतिश दुवावार,प्रशांत पाटील यांनी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...