Friday, July 3, 2026
Homeनाशिकइगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी नईमभाई खान यांची निवड

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी नईमभाई खान यांची निवड

इगतपुरी । वार्ताहर

घोटी – इगतपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर हे दोन महिन्याच्या कालावधीसाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नईमभाई खान यांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

इगतपुरी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व समित्या सभापती शिवसेनेकडे आहेत. नगराध्यक्ष संजय इंदुलकर हे अल्प कालावधीसाठी रजेवर गेले आहेत त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष पदाची धुरा विद्यमान उपनगराध्यक्ष नईमभाई रज्जाक खान यांच्याकडे सोपविण्यात आली या निवडीचे इगतपुरी शहर व परिसरात स्वागत करण्यात येत आहे.

इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली या संधीचा उपयोग इगतपुरी शहराच्या विकासासाठी करू. सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीखाली सर्वजण असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टिंगशनची अंमलबजावणी करावी, शासन व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, आपल्या परीसरात, तालुक्यात, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहरवासीयांनी काळजी घ्यावी असे आवाहन नवनियुक्त प्रभारी नगराध्यक्ष नईमभाई खान यांनी केले.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजीसह नातवाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी...