मनखेड । प्रातिनिधी
सुरगाणा तालुक्यातील जायविहीर गावातील शेतमजूरी करणारे जगन हरि गांगोडे रा जायविहिर मनखेड येथील रहिवासी आहेत या शेतकऱ्याने जनावरांसाठी चारा हा वेळेत मिळत नाही ह्या हेतूने या म्हणून मोल-मजुरी करून जवळील शेतकरी यांच्या कडून चारा विकत घेतला.
चारा पावसाने ओला होवू नये म्हणून जनावरांची काळजी म्हणून त्याने चारा ट्रॅक्टर च्या सहाय्याने घरी आणत असतांना गावात विजेच्या तारेचे अंतर हे खाली असल्याने विजेच्या तारांचा स्पर्श चाऱ्यास होऊन चाऱ्याने पेट घेतला. आग लागली ही घटना समजताच ट्रॅक्टर चालक पुंडलिक सुकर गवळी याने युक्ती सुचवून ट्रक्टर भर धाव वेगाने एका मोकळ्या जागेत नेऊन उभा केला. गावातील घरांना सुध्दा आग लागण्याची दाट शक्यता होती कोणतीही हानी गावात झाली नाही. ही घटना समाजात तलाठी स्वप्नील पालवी यांनी घटनास्थळी धाव घेवून सदरील झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान मागील काळात एक घटना याच गावात झाली होती गावातील एक विजेचा पोल एका घरावर अचानक पडला होता तेव्हा पण त्या घराचे पत्रे फुटले होते आणि असे बरेच प्रसंग या भागात घडलेले आहेत. विजेसंदर्भात या भागातील बऱ्याच समस्या असून या भागातील संबंधित प्रशासनाने जे पोल निकामी झालेली असतील ते बदलून व गावातील विजेच्या तारा व्यवस्थित ओढून घ्याव्यात आणि या पुढे अशी घटना घडू नये या साठी तात्काळ पोल सुध्दा मिळावे यासाठी संबंधीत प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी जायविहिर येथील ग्रामस्थांची होत आहे.




