Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

शिवडे | वार्ताहर | Shivde

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये सध्या बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये (Citizen) भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. त्यातच आज (रविवारी) दुपारी पांढुर्ली येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, खंडू पवार असे शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. आज (रविवारी) दुपारच्या सुमारास पवार हे शेतात इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी जात असताना अचानक समोरून आलेल्या बिबट्याने (Leopard) त्यांना हल्ला करून जखमी केले. यानंतर पवार यांना पांढुर्ली येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान, रात्रीच शिवडे येथील अमोल चव्हाणके यांच्या राहत्या घरासमोर टोमॅटोच्या शेतात (Tomato Farm) बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने (Forest Department) केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...