Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik News: पाथरे शिवारात धुडगुस घालणारा बिबट्या जेरबंद

Nashik News: पाथरे शिवारात धुडगुस घालणारा बिबट्या जेरबंद

पाथरे | वार्ताहर
पाथरे बुद्रुक शिवारात नांदूर मध्यमेश्वर कॅनॉलच्या भरावा लगत असलेल्या रवींद्र आळकुटे यांच्या उसाच्या शेजारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा वर्षा सव्वा वर्षाचा बिबट्या कैद झाला आहे. पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या सावजाच्या आमिषाने अडकलेल्या बिबट्याने जोराने डरकाळी फोडण्यास सुरुवात केली तेव्हा परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या बिबट्या टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पिंजऱ्याकडे धाव घेत बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वन विभागाला दिली. परिसरातील शेतकरी बाबासाहेब चिने, अरुण हागोटे, अमोल हागोटे, अमोल चिने, यांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री साडेबाराच्या दरम्यान बिबट्याला सिन्नर कडे रवाना केला.

साधारण दहा ते पंधरा दिवसापासून या परिसरात बिबट्या असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. बिबट्याने परिसरातील कुत्र्यांसह एक शेळी पण फस्त केली होती. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढत होती. संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधून तेथे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने या परिसरात पिंजरा लावला व गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान बिबट्या या पिंजऱ्यात अडकला.

- Advertisement -

या भागात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होती. बिबट्याच्या दहशतीमुळे या भागातील नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास धजावत नाहीये. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत आहे. दिवसा सुद्धा लहान मुले व महिला शेताकडे जाण्यास घाबरत आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने ही दहशत आता काहीशी कमी झाली आहे असे मत भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0
दिंडोरी | प्रतिनिधी जानोरी येथे ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (३१, रा. मुखेड, ता. निफाड)...