Friday, May 29, 2026
HomeनाशिकNashik News : 'निसाका' परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिक भयभीत

Nashik News : ‘निसाका’ परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिक भयभीत

कसबे सुकेणे | प्रतिनिधी | Kasbe Sukene

- Advertisement -

गतकाळी नावलौकिक असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्यांचा (Niphad Cooperative Sugar Factory) नावलौकिक राज्यभरात होता. परंतु, हा कारखाना आता अखेरच्या घटका मोजत असून, बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याच्या परिसरात आता कामगार आणि ऊसाऐवजी बिबट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) भाऊसाहेब नगर येथील बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या कार्य स्थळाजवळ मंगळवार (दि. २२) रोजी रात्री बिबट्याचा (Leopard) मुक्तसंचार शेतकऱ्यांनी दिसून आला. निफाड कारखान्याकडून कसबे सुकेणेकडे जाणाऱ्या चौकात हा बिबट्या संरक्षण भिंत असलेल्या सिमेंटच्या सुरक्षा कुंपणावर मुक्तसंचार करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून कसबे सुकेणे, निसाका, पिंपरी रौळस, पिंपळस रामाचे, वडाळी नजीक, गोंडेगाव आणि चांदोरी या शिवारात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. बंद अवस्थेत असलेल्या निसाकाच्या कार्यस्थळावर बिबट्या दिसल्याने काही शेतकऱ्यांनी त्याचा मुक्तसंचार करत असल्याचे व्हिडिओ काढल्याने ते समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद (Imprisoned) करावे, अशी मागणी निसाका परिसरातून होत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : उपोषण स्थगित करण्याची आज विनंती करणार – ना. विखे...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून आज...