Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News: नाशिकमध्ये IG ऑफिस परिसरात बिबट्याची एन्ट्री, भल्या पहाटे पोलीस अन्...

Nashik News: नाशिकमध्ये IG ऑफिस परिसरात बिबट्याची एन्ट्री, भल्या पहाटे पोलीस अन् वनविभागाची धावपळ; नेमकं काय घडलं?

नाशिक। प्रतिनिधी
आज पहाटे 04.30 वाजता गडकरी चौक येथील मा. वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्यप्राणी बिबट दिसून आला… सदर माहिती मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांचेसह वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक (गुगल श्वान) तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले…

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा वावर दिसून आला. त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वानपथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी IGP ऑफिस व शासकीय निवासस्थान परिसर पूर्ण पिंजून काढला.

- Advertisement -

तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक यांचे कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत वन्यप्राणी बिबट आढळला नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा...