Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मालगाडीच्या धडकेत 'मॅजिक' वाहनाचा चक्काचूर

Nashik News : मालगाडीच्या धडकेत ‘मॅजिक’ वाहनाचा चक्काचूर

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

- Advertisement -

मनमाड | प्रतिनिधी Manmad

रेल्वेच्या मालगाडीने रुळावर बंद पडलेल्या मॅजिक कारला जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी शहरातील गर्डरशॉप भागात घडली. मॅजिक मधून सर्वजण वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला असला तरी मॅजिकचा मात्र चेंदामेंदा झाला. शहराच्या मध्यभागी एफसीआय धान्य गोडाऊन असून त्यात रेल्वेच्या माध्यमातून धान्य पुरवठा केला जातो रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला वसाहत असल्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे. रुळावर फाटक नसल्याने हा अपघात झाला त्यामुळे गेट बसविण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील चंदनवाडी भागात ब्रिटीशकालीन भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) धान्य साठविण्याचे गोडाऊन असून तब्बल २६५ एकरावर असलेल्या एफसीआयमध्ये ३२ सायलो आणि १२५ पेक्षा जास्त गोडाऊन आहे त्यात हजारो मेट्रिक टन धान्य साठवले जाते. पंजाब, हरियाणा यासह इतर राज्यातून रेल्वे द्वारे गहू आणि तांदूळ आणले जाते. त्यानंतर या धान्य राज्यातील रेशन दुकानावर पुरवठा केला जातो. गोडाऊनमध्ये धान्य पोहोचविण्यासाठी रेल्वे स्टेशनं, मालधक्का ते एफसीआय पर्यत रेल्वे लाईन असून ही लाईन शहरातील मध्य भागातून जाते रेल्वे रुळाच्या एका बाजूला चंदनवाडीसह इतर वसाहती तर दुसर्‍या बाजूला गर्डरशॉप आहे शिवाय इतर १० खेड्यातील नागरिक, शेतकर्‍यांसह गर्डर शॉपमधील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार यांची ये-जा होत असते. या सर्वाना रेल्वे रूळ ओलांडून शहरात जावे लागते.

यापुर्वीही रुळावर रेल्वे मालगाडी तासन्ंतास उभी राहिल्यामुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांना ताटकळतं उभे रहावे लागले. काही वेळा तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर देखील झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...