Monday, February 16, 2026
Homeमुख्य बातम्याMalegaon Municipal Corporation : "टिपू सुलतानचा फोटो..."; उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या विधानामुळे वाद...

Malegaon Municipal Corporation : “टिपू सुलतानचा फोटो…”; उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या विधानामुळे वाद वाढणार, नेमकं काय म्हणाल्या?

नाशिक | Nashik

मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर (Deputy Mayor) शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील भिंतीवर टिपू सुलतानचे तैलचित्र लावण्यात आले होते. यावरून हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना आणि भाजप आक्रमक झाली होती. यानंतर टिपू सुलतानचे तैलचित्र हटविण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आयुक्त रविंद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढला होता. यामुळे वातावरण काहीसे थंड झाले होते. पंरतु, आता उपमहापौरांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात येईल, असे म्हटल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कार्यक्रमात बोलताना उपमहापौर शान-ए-हिंद (Shan-e-Hind) यांनी दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच इंग्रजांविरोधात लढणाऱ्या योद्ध्याचा फोटो लावण्यात गैर काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Malegaon Municipal Corporation : उपमहापौर दालनात टिपू सुलतान; मालेगावी तैलचित्र हटवण्यासाठी हिंदुत्ववादींसह शिवसेना आक्रमक

दरम्यान, शुक्रवार (दि.०६) रोजी मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी (Mayor) ‘इस्लाम’ पक्षाच्या नसरीन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांची निवड झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचे तैलचित्र लावले होते. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

भाजप आणि काँग्रेस आमनेसामने

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगावातील प्रकरणावर भाष्य करताना ‘ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलतानाने’ काम केल्याचे म्हटले होते यावरून भाजपने सपकाळ यांनी टीपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचा दावा केला होता. त्यावरून काल (रविवारी) राज्यभर भाजपाकडून सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. यात पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांसह महिला पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले होते.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : “सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत…”; रोहित पवार...

0
मुंबई । Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागात मात्र संशयास्पद हालचाली झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर...