Thursday, October 8, 2026
HomeनाशिकGirish Mahajan : नाना पाटेकरांच्या निधनाने मन अत्यंत व्यथित; मंत्री गिरीश...

Girish Mahajan : नाना पाटेकरांच्या निधनाने मन अत्यंत व्यथित; मंत्री गिरीश महाजनांकडून शोक व्यक्त

नाशिक | Nashik

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनानंतर संपूर्ण कला आणि राजकीय विश्वातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “नाना पाटेकर हे केवळ माझे जिवलग मित्रच नव्हते, तर ते समाजासाठी सदैव काहीतरी करण्याची तळमळ असणारे एक अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी आदरांजली वाहिली.

- Advertisement -

पडद्यावरील अभिनयापेक्षा माणूस म्हणून असलेले मोठेपण भावणारे

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना गिरीश महाजन म्हणाले, “अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या दमदार आणि वास्तववादी अभिनयाने नानांनी अढळ स्थान निर्माण केले. पडद्यावरची प्रत्येक भूमिका ते अक्षरशः जगत असत. मात्र, पडद्यावरील नाना आणि प्रत्यक्ष आयुष्यातील नाना यांच्यातील माणूस म्हणून असलेले मोठेपण अधिक भावणारे होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणातही माणुसकी होती आणि साधेपणातही एक विलक्षण मोठेपणा होता” असे त्यांनी म्हटले.

सामाजिक कार्याचा दिला संदर्भ

नाना पाटेकर यांच्या सामाजिक योगदानाचा आवर्जून उल्लेख करत महाजन यांनी सांगितले की, शेतकरी (Farmer) दुष्काळग्रस्त आणि गरजू माणसांच्या मदतीसाठी नानांनी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. त्यांनी निर्माण केलेला अभिनयाचा समृद्ध वारसा आणि समाजासाठी केलेले कार्य पुढील अनेक पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील, असेही महाजन म्हणाले.

त्यांची उणीव आयुष्यभर जाणवेल

“नानांसोबतचे माझे मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आज मनात दाटून येत आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची मोठी हानी झाली असून त्यांची उणीव आयुष्यभर जाणवत राहील,” असे सांगत गिरीश महाजन यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांसह लाखो चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना केली.

ताज्या बातम्या

Nashik Pothole News : कामासाठी खोदलेला खड्डा ठरला जीवघेणा! ६१ वर्षीय...

0
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर शहरभर सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी रस्ते खोदले जात असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....