Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : आमदार रोहित पवारांची सखोल पोलीस चौकशी व्हावी - क्रीडामंत्री...

Nashik News : आमदार रोहित पवारांची सखोल पोलीस चौकशी व्हावी – क्रीडामंत्री कोकाटे

नेमकं प्रकरण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा अधिवेशनात (Vidhansabha Session) ‘रमीचा डाव’ (पत्ते) खेळत असतानाचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ आहे. मला खेळता येत नाही. मात्र, आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘एक्स’ वर व्हायरल केलेल्या व्हिडीओमुळे माझी व पक्षाची बदनामी झाली आहे. त्यामुळे आ. पवार यांनी माफी मागावी, असा जबाब राज्याचे क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. रुपाली नरवाडिया यांच्यासमोर सोमवारी (दि. ६) रोजी नोंदविला.

- Advertisement -

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री तथा विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यावरून राज्यभरात मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतर, मंत्री कोकाटे यांनी आमदार पवार यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.६) सुनावणीसाठी मंत्री कोकाटे उपस्थित होते. यावेळी न्या. नरवाडिया यांच्यासमोर मंत्री कोकाटे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला.

यानंतर, कोकाटे यांनी ‘आ. पवार हे विधान परिषदेचे सदस्य नसताना त्यांनी व्हिडिओ कसा काढला, त्यांना तो मिळाला कसा’, असे प्रश्नही त्यांनी जबाब नोंदविताना उपस्थित केले. आ. पवार यांना नोटीस बजावूनही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे न्यायासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाला विनंती केली आहे की पवार यांना योग्य ती शिक्षा व्हावी. तो व्हिडिओ कोणी काढला हॅक करून केलाय का? हे समोर येणे गरजेचे आहे, असे कोकाटे यांची वकील अॅड. मनोज पिंगळे यांनी सांगितले.

तर, आता येत्या गुरुवारी (दि. ९) पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रकरणात एकीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक पवित्र्यात राहिले, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटें यांनी न्यायालयाचा (Court) दरवाजा ठोठावून बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. आता पुढील सुनावणीत काय घडते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

त्यांची चौकशी व्हावी….

व्हिडीओमुळे शेतकऱ्यांची व माझी बदनामी झाली आहे. पवार यांनी नोटीसीची खिल्ली उडविली. माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी कोर्टासमोर फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी फोटो कसा मिळवला ? कुठून मिळवला ? आदी बाबी पवार यांनी जबाबात नोंदवणं गरजेचे आहे. सखोल पोलीस चौकशी झाली पाहिजे.

– अॅड. माणिकराव कोकाटे, मंत्री क्रीडा व युवक कल्याण

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...