Tuesday, August 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShivsena UBT News : नाशिकमधील खड्ड्यांबाबत शिवसेना लवकरच...; खासदार संजय राऊतांची मोठी...

Shivsena UBT News : नाशिकमधील खड्ड्यांबाबत शिवसेना लवकरच…; खासदार संजय राऊतांची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

शहरात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर (Nashik) त्रस्त झाले असून, महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.८) रोजी महापालिकेची विशेष सभा पार पडली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT Party) नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. या नगरसेवकांनी (Corporators) हाताला प्लास्टर आणि डोक्याला पट्टी बांधून महासभेत दाखल झाले होते. त्यामुळे शनिवारची महासभा चांगलीच गाजली.

- Advertisement -

दरम्यान याच खड्ड्यांच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये (Nashik) मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (रविवारी) सकाळी माध्यमांशी बोलताना दिली. नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) ठाकरेंच्या पक्षाचे गटनेते नगरसेवक केशव पोरजे, योगेश भोर यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, “नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) दररोज पाच ते पंचवीस लोक जखमी होत आहेत. नाशिक हे अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक शहर असून, त्यांचे चंपतराय गिरीश महाजन हे त्याठिकाणी प्रमुख आहेत. मात्र, अजूनही शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. काल (शनिवारी) आमच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका सभागृहात हाताला, डोक्याला प्रातिनिधिक स्वरुपात बँडेज बांधत आता तरी शहरातील खड्डे प्रशासनाने बुजवावे यासाठी आंदोलन केले” असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, नाशिकमध्ये अजूनही रस्ते बुजविण्याचे किंवा भरण्याचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे या संदर्भातील एक मोठे आंदोलन शिवसेना नाशिकमध्ये लवकरच करणार आहे. ते आंदोलन इतके मोठे असेल कि महाराष्ट्रातील (Maharashtra) खड्डे त्या आंदोलनामध्ये भरले जातील. देवेंद्र फडणवीस हे दोनदा मुख्यमंत्री झाले तरी नाशिक हे अजूनही त्यांचेच दत्तक शहर आहे. फडणवीस हे नाशिकला कधी विमानाने जाता कधी हेलिकॉप्टरने जातात, परंतु लोकांनी कसा प्रवास करायचा? त्यांनी खड्ड्यात पडून जखमी व्हायचे. खड्ड्यांमुळे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर सामना वृत्तपत्रात अग्रलेख देखील लिहिला होता.पाच ते सहा जण कोमामध्ये आहेत. याबाबतचे गांभीर्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) किंवा गिरीश महाजन यांना नाही” असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) तोंडावर आला असून, शहरात ठेकेदारीची कामे चालू आहेत. सिंहस्थात जे साधू-महंत येणार आहेत त्यांनी खड्ड्यात पडायचे का? त्यांना तुम्ही खड्ड्यांतून प्रवास करायला लावणार आहात का? त्यांचे हिंदुत्व खड्ड्यात घालणार आहात का? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी नाशिकमधील खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाला दणका देणार असल्याचे म्हटले. तसेच नाशिकमधील हे आंदोलन सरकारविरोधात आणि त्यांच्या नाकर्तेपणाविरोधात असेल. याशिवाय महापालिका आयुक्त, प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचे चंपतराय गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरोधातही हे आंदोलन असेल असं म्हणत नाशिकमधील पै-पैचा हिशोब मागवा लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण...