Friday, May 1, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात; २५ हजार मुस्लिम बांधवांनी अदा...

Nashik News : नाशिकमध्ये रमजान ईद उत्साहात; २५ हजार मुस्लिम बांधवांनी अदा केली सामुदायिक नमाज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पवित्र रमजान महिन्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्रनिमित्त (Ramdan Eid) नाशिक शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील शहाजानी ईदगाह मैदानावर सुमारे २५ हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज अदा केली. सकाळी सात ते नऊ या वेळेत नमाज पठण पार पडले असून संपूर्ण परिसरात आनंद, बंधुभाव आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

शहरातील सुमारे ४० पेक्षा जास्त मशिदींमध्येही ईदची नमाज (Namaz) मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने अदा करण्यात आली. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी नव्या वस्त्रांमध्ये सणाचा आनंद लुटला. ईदगाह मैदानावर नाशिक नगरीच्या महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन सणाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी विरोधी पक्ष नेत्या हेमलता पाटील, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. सुभाष देवरे, गुलजार कोकणी, बबलू खैरे, स्वप्नील पाटील यांच्यासह पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, विजयकुमार चव्हाण आदी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोलताना, ईद हा सण प्रेम, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा असून शहरात बंधुभाव आणि ऐक्य कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, शहरातील (City) विविध भागांमध्येही ईद साजरी करण्यात आली असून बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. एकूणच नाशिकमध्ये (Nashik) ईद-उल-फित्रचा सण उत्साह, आनंद आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा झाला.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...