Monday, April 6, 2026
HomeनाशिकNashik News : आयुक्तालयाचा 'सायलेंट स्ट्रोक'; दमदार कामगिरीचा अभाव

Nashik News : आयुक्तालयाचा ‘सायलेंट स्ट्रोक’; दमदार कामगिरीचा अभाव

शिस्तीच्या निकषावर दोन अधिकारी थेट बंदोबस्तावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Police Commissionerate) अंतर्गत कामकाजात शिस्त आणि प्रभावी नियंत्रणाचा पुनर्विचार करत दोन प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष बंदोबस्ताच्या कर्तव्यावर रवाना केले आहे. नाशिकरोड वाहतूक युनिटमधील पोलीस निरीक्षक आणि गुंडाविरोधी पथकातील सहायक निरीक्षकास पोलीस ठाण्यांत संलग्न करण्यात आले असून, पुढील आदेशापर्यंत त्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

कायदा-सुव्यवस्थेच्या कारणासाठी या नेमणुका असल्या तरी कामकाजातील त्रुटी, अपेक्षित कामगिरीचा अभाव आणि कार्यालयीन शिस्तीच्या मुद्यांवरून दोघांबद्दल हा निर्णय झाल्याची चर्चा आयुक्तालयात आहे. बदली न करता थेट ‘ऑनफिल्ड’ जबाबदाऱ्यांचा हा निर्णय ‘समज देणारा’ असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आदेश जारी करताच दोन्ही अधिकाऱ्यांचा मूळ कार्यभार आयुक्तालयाने तत्काळ बदलला.

गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मुंबईनाका पोलीस ठाण्यात नेमण्यात आले असून, त्यांच्या जागी नाशिकरोड गुन्हे युनिटचे प्रभारी व उपनिरीक्षक संदीप पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तरनाशिकरोड वाहतूक युनिटचे पोलीस निरीक्षक तुषार अढावू यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात संलग्न करण्यात आले असून, त्यांची जबाबदारी सहायक निरीक्षक यतीन पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

यामुळे निर्णय?

बंदोबस्तावर नेमलेल्या दोनपैकी एका सहायक निरीक्षकाची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी समाधानकारक दिसून आली नाही. वारंवार सूचनांनंतरही प्रभावी कामकाज न दिसल्याने आयुक्तालयाने हा निर्णय घेतल्याचे समजते. तर एका सहायकाने आयुक्तांशी कार्यालयीन कामकाजावेळी चुकीचा संवाद केल्याने पोलीस निरीक्षकाने आयुक्तालयाची नाराजी ओढावून घेतल्याची चर्चा आहे.

बदलीची चाहूल अन् ‘जुळवाजुळव ‘

आयुक्तालयातील सहायक आयुक्त, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच पोलीस निरीक्षकांच्या नियमित बदल्यांची प्रक्रिया पोलीस महासंचालक कार्यालयातून सुरू झाली आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्चमध्ये या बदल्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, नाशिकमधील कार्यकाळ संपत आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नव्या नियुक्तीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. काहींनी पुढील पोस्टिंगसाठी ‘जुळवाजुळव’ सुरू केली असल्याची चर्चा आहे, तर काही अधिकारी नाशिकमध्येच राहण्यासाठी इच्छुक असून वेगवेगळ्या विभागात कामकाजास तयार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Crime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरामध्ये कत्तलखाने (Slaughterhouses) उध्वस्त केल्यानंतर पुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रविवारी (दि.5) भारतनगर परिसरात छापा (Raid) टाकून 8...