Thursday, October 22, 2026
HomeनाशिकNashik News : अल निनोचा विळखा! धरणांच्या माहेरघरातच पावसाची पाठ; जिल्हा तहानलेला,...

Nashik News : अल निनोचा विळखा! धरणांच्या माहेरघरातच पावसाची पाठ; जिल्हा तहानलेला, खरीप पेरण्या खोळंबल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा नाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जून महिना पूर्णतः कोरडा गेल्यानंतर, जुलैच्या सुरुवातीला पावसाने किंचित हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यातील पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत जून-जुलै महिन्याच्या सरासरीच्या अवघा ४३.४ टक्के पाऊस झाला असून, ज्या भागात सर्वाधिक पाऊस पडतो अशा तब्बल ५ तालुक्यांमध्येच पावसाने दडी मारली आहे. यामुळे यंदाच्या खरिपाच्या पेरण्यांना मोठा ब्रेक लागला आहे.

महिनाभर उशीर; कृषी संकट गडद

सर्वसाधारणपणे 8 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात खरीप पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 47 हजार 828 हेक्टरवर (फक्त 7.40 टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी जून अखेरपर्यंत 250 मि.मी. पाऊस होऊन 31 टक्के पेरण्या झाल्या होत्या, यंदा मात्र जूनअखेर केवळ 66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आधीच पेरण्यांना महिनाभर उशीर झाल्याने शेतकर्‍यांपुढील संकट गडद झाले आहे.

धरण क्षेत्रातील कोरडेपणा चिंता वाढवणारा

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या भागात नाशिकची प्रमुख धरणे आहेत आणि ज्याला पावसाचे माहेरघर मानले जाते, त्या इगतपुरी, दिंडोरी, नाशिक सुरगाणा आणि पेठ आणि तालुक्यातच पावसाचे प्रमाण अल्प आहे. पाणलोट क्षेत्रातच पाऊस नसल्याने मयंदा धरणे भरणार का?फ असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शहरासह जिल्ह्याच्या पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

कुठे किती पाऊस? (तालुकावार टक्केवारी)

80 ते 90 टक्के पाऊस (समाधानकारक): नांदगाव (90.8 टक्के), कळवण (88.8 टक्के), चांदवड (88.7 टक्के), बागलाण (85.2 टक्के)
60 ते 80 टक्के पाऊस (मध्यम): मालेगाव (64.7 टक्के), येवला (60.2 टक्के)
50 ते 60 टक्के पाऊस (अपेक्षित): देवळा (59.9 टक्के), निफाड (56.5 टक्के), त्र्यंबकेश्वर (50.8 टक्के), सिन्नर (50.5 टक्के)
25 ते 50 टक्के पाऊस (अल्प): दिंडोरी (47.1 टक्के), नाशिक (37.2 टक्के), सुरगाणा (26.1 टक्के)
10 ते 20 टक्के पाऊस (चिंताजनक स्थिति): पेठ (19.4 टक्के), इगतपुरी (12.1 टक्के)
जिल्ह्यात जून, जुलै सरासरी पाऊस: 97.3 टक्के, प्रत्यक्षात आतापर्यंत 43.4 टक्के

आतापर्यंत झालेली पेरणी: 7.40 टक्के (47,828 हेक्टर)

जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून सरी कोसळत असल्या, तरी पेरण्यांसाठी आवश्यक असणार्‍या मुसळधार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

ताज्या बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताची विजयी सलामी; २२६...

0
नवी दिल्ली | New Delhi न्यूझीलंडविरुद्ध भारत (India) यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेला क्राईसचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर दिमाखात सुरुवात झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या...