Thursday, July 23, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिकवर पाणीकपातीचे संकट; कारण काय?

Nashik News : नाशिकवर पाणीकपातीचे संकट; कारण काय?

नाशिक | Nashik

नाशिककरांच्या (Nashik) डोक्यावर यंदा पाणीटंचाईची टांगती तलवार असून, महापालिकेकडे उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ ३१ जुलैपर्यंतच पुरेल अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अल-निनोचा प्रभाव आणि पावसाच्या विलंबाची शक्यता पाहता, जलसंपदा विभागाने हा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरात १५ टक्के पाणी कपात किंवा आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यासारखे कठोर निर्णय घेण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

- Advertisement -

शहराचा विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या अनेक भागांत पाणीपुरवठ्याची ओरड सुरू आहे. त्यातच टँकरच्या नियोजनावरूनही महासभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महापौरांनी आदेश देऊनही प्रभागांमध्ये वेळेवर टँकर (Tanker) उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये (Citizen) तीव्र संताप असून, पाण्यासाठी ठिकठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांतील (Dams) राखीव साठा मर्यादित असल्याने महापालिकेला आतापासूनच पावले उचलावी लागणार आहेत. नवीन नाशिक, पंचवटी आणि नाशिक रोड या भागात आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा स्थितीत ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

आल-निनोचा धोका कायम

यंदाही जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिकेने मंजूर कोट्याचा वापर अत्यंत जपून करावा, अशा सूचना राज्य शासनाच्या मुख्य अभियंता कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.

सध्या शहराला पाणीपुरवठा मुबलक आहे. मात्र, शासनाच्या सूचनांनुसार पुढील नियोजन केले जाईल. वरिष्ठांशी चर्चा करून आवश्यक ते निर्णय घेतले जातील, नागरिकांनी पाणी वापरात दक्षता घ्यावी.

रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

ताज्या बातम्या

अभिजीत

Abhijeet Dipke On PM Modi: “Hi my name is Nothing”; पंतप्रधानांच्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची...