Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News : पोलीस आयुक्त कर्णिक यांचा 'खरात' पॅटर्न चर्चेत; फडणवीस अन्...

Nashik News : पोलीस आयुक्त कर्णिक यांचा ‘खरात’ पॅटर्न चर्चेत; फडणवीस अन् राऊतांकडून कौतुक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कायदा कुणासाठीही थांबत नाही आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, हे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ज्या स्वयंघोषित कॅप्टन खरात बाबाच्या नावाचा दरारा पाहून भल्याभल्यांनी त्याच्या नादाला न लागण्याची जणू शपथच घेतली होती, त्याच खरातचा नालायक आणि विकृत चेहरा कर्णिक यांनी जगासमोर आणला आहे. या धाडसी कारवाईमुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे समर्थन केले आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही. पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे समर्थ आहे. संदीप कर्णिक यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ज्या पद्धतीने हा तपास हाताळला, त्याचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आहे. प्रशासनान दाखवलेल्या या ‘डेरिंग’ मुळे सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.

राऊत यांनी म्हटले आहे की, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. खरातसारख्या प्रवृत्तींना ठेचण्यासाठी अशाच सक्षम व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची गरज होती. खरातचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल त्यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. वर्दीमध्ये जर प्रामाणिकपणा आणि हिंमत असेल तर कितीही मोठा ‘खरात’ असला तरी त्याला कायद्याच्या चौकटीत यावेच लागते. नाशिककरांनी (Nashik) या कारवाईचे स्वागत करत, असाच आयुक्त हवा ! अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्दे

कर्णिक यांचा दणका : खरातच्या दहशतीला न जुमानता पोलीस आयुक्तांनी थेट अटकेची कारवाई केली.
विकृत चेहरा उघड : पद आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या खरातचा खरा चेहरा जगासमोर आला.
सर्वपक्षीय पाठबळ : सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी कर्णिक यांच्या ‘डेरिंग’चे स्वागत.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...