Thursday, October 15, 2026
HomeनाशिकNCP Nashik Camp : राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमधील शिबीर पुढे ढकलले; कारण काय?

NCP Nashik Camp : राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमधील शिबीर पुढे ढकलले; कारण काय?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक (Nashik) येथे होणारे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. पक्षाच्यावतीने मंगळवारी या निर्णयाची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून  शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्यात सध्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटाचा आढावा घेतला जात आहे. दुष्काळामुळे १९ जिल्ह्यांतील पिके आणि चारा,पाण्याची परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी हवालदिल आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पक्षाचे शिबीर (Camp) पुढे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील दुष्काळाच्या (Drought) संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत पुढाकार घेऊन उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या दाळमंडईत संशयित भेसळयुक्त भगर जप्त

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपवासासाठी वापरण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत अहिल्यानगरच्या दाळमंडईतील मे....