नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या चेअरमनपदी निवृत्ती अरिंगळे (Nivrutti Aringale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या इंगळे नगर शाखेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक संपन्न झाली. माजी अध्यक्ष अशोक चोरडिया यांनी दोन आठवड्यापूर्वी राजीनामा दिल्यानंतर सदरची जागा रिक्त झाली होती.
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेत (Nashik Road Deolali Vyapari Bank) २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत (Election) दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने पूर्ण बहुमत मिळविले होते. सुरुवातीला दत्ता गायकवाड हे सव्वा दोन वर्ष चेअरमन होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असता त्यांच्या जागी अशोक चोरडिया चेअरमन झाले होते. परिणामी चोरडिया यांची मुदत संपल्याने त्यांनी दोन आठवड्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, रोटेशन पद्धतीनुसार नव्याने आता पुन्हा निवृत्ती अरिंगळे यांची निवड झाली आहे. या निवडी प्रसंगी माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले, संचालक जगन आगळे, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, अरुण जाधव, डॉ. प्रशांत भुतडा, सुनील चोपडा, रमेश डोंगरे, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, गणेश खर्जुल, विलास पेखळे, रंजना बोराडे, बाबा सदाफुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश पडोळ आदी उपस्थित होते.




