Tuesday, May 5, 2026
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : "पंतप्रधान मोठे संशोधक, त्यांनी नाल्यातून गॅस…"; खासदार राऊतांचा मोदींना...

Sanjay Raut : “पंतप्रधान मोठे संशोधक, त्यांनी नाल्यातून गॅस…”; खासदार राऊतांचा मोदींना खोचक टोला

मुंबई | Mumbai

इराण आणि अमेरिका-इस्त्रायल (Iran and America-Israel War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ राज्यातील उद्योग धंद्यांसह सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, हॉटेल चालकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आहे. हे युद्ध आणखी आठवडाभर सुरू राहिल्यास याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवर देखील होण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की,”पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे फार मोठे वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, त्यांनी काही वर्षांपूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येते. नाल्यामध्ये पाइप टाकायचा आणि त्यामधील गॅसवर आपल्या घरातील चुली पेटवता येतात. हा त्यांचा शोध आम्हाला आठवला आहे. त्यामुळे आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा. त्यांच्या या संकल्पनेतून मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर गॅस निर्मितीचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना आवर्जून बोलवावे. या कामासाठी लागणारे पाईप्स किंवा इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. मिठी नदी यशस्वी झाली की यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल”, असे म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, “केंद्र सरकारचे (Central Government) भारताला शंभर वर्षे मागे नेण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे गाड्या रस्त्यावर धावण्याऐवजी पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग येईल की काय, अशी भीती आहे. महाराष्ट्रात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. याचा. फटका शेतकऱ्यांना, कष्टकरी, मजूर, हॉटेल उद्योग, मोटार उद्योग, टाईल्स उद्योग, इंजिनियरिंग उद्योगाला बसतो आहे. पण मोदी आणि त्यांचे भक्त यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ते घड्याळ’ पंधरा दिवसात फिरणार

0
श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur शहरातील नेहरु भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्तीसाठी भाजपचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन...