Tuesday, October 22, 2024
HomeनाशिकNashik News : जुने सीबीएस कात टाकणार; दहा कोटीत होणार पुनर्बांधणी

Nashik News : जुने सीबीएस कात टाकणार; दहा कोटीत होणार पुनर्बांधणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मेळा बसस्थानक, ठक्कर बाजारनंतर आता जुने बसस्थानक (Old Bus Stand) पुनर्बांधणीसाठी सज्ज झाले आहे. नाशिक येथील जुने सीबीएस स्थानक बर्‍याच वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर आता आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांच्या प्रयत्नातून सीबीएस निधीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

आमदार फरांदे यांनी जुने सीबीएस बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी (Reconstruction) दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. सीबीएस येथील जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत (Building) व आगार उभे राहणार आहे. यासाठी दोन मजली इमारत उभी राहणार असून तळमजल्यावर ९५० चौरस मीटरचे काम होणार आहे. तर पहिल्या मजल्यावर ५९० चौरस मीटरचे काम होणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : मालेगावमध्ये डाळिंब इस्टेट मंजूर; मंत्री दादा भुसेंच्या पाठपुराव्याला यश

तसेच नवीन इमारत व आगारासाठी सांडपाण्याची (Sewage) व्यवस्थादेखील नव्याने करण्यात येणार आहे. सीबीएस परिसरातील ४४०० चौरस मीटर क्षेत्राचे काँक्रिटीकरण होणार असून पेव्हर ब्लॉकदेखील बसविण्यात येणार आहे. फायर फायटिंगमध्ये व रेन हार्वेस्टिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधादेखील या बसस्थानकात उपलब्ध होणार आहे.

हे देखील वाचा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ

दरम्यान, मेळा बसस्थानकाची (Mela Bus Stand) सुंदर इमारत उभी राहिल्यानंतर आमदार फरांदे यांनी जुने सीबीएसचे काम हाती घेतल्यामुळे आता येथे देखील सुंदर इमारत उभी राहणार आहे. या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी जुन्या बस स्थानकावरुन कळवण, सटाणा, देवळा, मालेगावकडे जाणार्‍या बसेस या ठक्कर बस स्थानकावरुन सुटणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या