Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : कांदा लागवडीला वेग; मजूरटंचाईची समस्या

Nashik News : कांदा लागवडीला वेग; मजूरटंचाईची समस्या

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

सध्या कसमादे पट्टयासह कळवण तालुक्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याची लागवड (Onion Cultivation) सुरू आहे. मजुरांनी मोठ्या प्रमाणावर रोजंदारीत वाढ केल्यामुळे व सर्वत्र एकाच वेळेस लागवड सुरू असल्यामुळे शाळा-कॉलेजला दांड्या मारून शालेय विद्यार्थीही (Students) मिशन कांदा लागवडीसाठी आई वडिलांना मदत करत असल्याचे चित्र सध्या रवळजीसह पुनदखोरे परिसरातील शेतांमधून दिसत आहे.

- Advertisement -

कळवणसह (Kalwan) पुनदखोरे परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. भारनियमनामुळे रवळजी, देसराणे, मोकभणगी, इन्सी, धनेर या गावांमध्ये एका सप्ताहात तीनच दिवस दिवसा लाईट मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रात्रीचा दिवस करत मेहनत कसरत करावी लागत आहे. या दिवसांत शेतकरी सकाळी उठल्यावर सहा वाजताच मजुरांच्या दारी जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे महागडी मजुरी देऊनही ‘मजूर मिळेल का मजूर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर (Farmer) आली आहे.

दरवर्षी डांग जिल्ह्यातील आहवा, शबरी व पश्चिम पट्ट्यातून मजुरांचा जथ्था (पार्टी) येतो. यंदा त्यांनीही बत्ती दिल्याने नेहमीच्या शेतकऱ्यांचा नियोजनाचा अंदाज चुकला असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे मजुरीच्या दरातही यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. घरची कांदा लागवड व मजूरही मिळत नसल्यामुळे पालकांकडून विद्यार्थ्यांना लागवडीसाठी शाळेला सक्तीची सुटी घेण्यास भाग पाडले जात आहे.आपल्या मुलांकडून कांदा रोपे उपटणे, पाणी भरणे, वावर बांधणे, खाद्य टाकणे, मजुरांजवळ कांदा रोपचे क्रेट वाहून नेणे इत्यादी कामांनी शालेय मुले घामाघूम झालेले दिसत आहेत.

नियमित शाळेला (School) दांडी मारणारे बहाद्दर आता शाळेत जाण्याकरता काहीतरी घरच्यांना कारणे सांगून पळवाटा शोधत असल्याचे शेतातील मजूर वर्ग दुपारच्या जेवणाच्या वेळत खमंग चर्चा रंगताना दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शाळांची उपस्थिती रोडावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.मजूर वर्गाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर मजुरीत वाढ केली आहे. तीनशे ते चारशे रुपये देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे व कांदा रोप दिवसागणिक खराब होत असल्यामुळे मोठे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर या मोसमात गावागावांत दिवसा सामसूम दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...