Friday, April 3, 2026
HomeनाशिकNashik News : थर्टीफर्स्टचा उत्साह शिगेला; ७३ ठिकाणी परवानगीसह पार्ट्या

Nashik News : थर्टीफर्स्टचा उत्साह शिगेला; ७३ ठिकाणी परवानगीसह पार्ट्या

पहाटेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करताना नाशिककरांचा (Nashik) उत्साह ओसंडून वाहत असतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर व जिल्हा पोलिसांनी पहाटेपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला. ‘थर्टी फर्स्ट नाईट’ निमित्त परवानगी दिलेल्या ७३ ठिकाणी पाठ्यर्चा रंगल्या, तर उर्वरित ठिकाणी पोलिसांनी तपासणी करत गैरप्रवृत्तीवर कारवाई केली. सायंकाळी साडेसहा वाजेपासून सुरू झालेला बंदोबस्त पहाटे साडेपाचपर्यंत तैनात होता. काही संशयितांना ताब्यात घेत शहरासह केली.

- Advertisement -

जिल्ह्यात तळीरामांची धरपकड रात्री बारा वाजताच शहरात नववर्षांचा जल्लोष सुरू झाला. शहरासह ग्रामीण भागातील हटिल्स, फार्महाऊस व रिसॉर्टमध्ये तरुणाईची लक्षणीय गर्दी दिसून आली. अनेकांनी शनिवार-रविवारीच सेलिब्रेशन करून नववर्ष स्वागताचा आनंद साजरा केला. मात्र, पोलिसांच्या चोख नियोजनामुळे कुठेही गोंधळ, हुल्लडबाजी अथवा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नव्हते. नाशिक परिक्षेत्रात बुधवारी (दि.३१) पहाटेपर्यंत सुमारे सव्वापाच हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेत दीडशेहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर ८० पेक्षा अधिक मद्यपींना ताब्यात घेण्यात आले. संशयित मद्यपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली.

भागवत एकादशीमुळे अनेक नागरिकांनी (Citizen) मांसाहार टाळत मद्यपानास प्राधान्य दिल्याचे चित्र होते. त्यामुळे दिवसभर वाईन शॉप्स आणि मद्यविक्री केंद्रांवर गर्दी दिसून आली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी या परिसरात विशेष गस्त व रात्री आठनंतर अतिरिक्त बंदोबस्त नेमला. पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीतील आस्थापना वेळेत बंद व्हाव्यात यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. शहरात ३९ ठिकाणी नाकाबंदी तर ७३ ठिकाणी ‘स्टॉप अॅण्ड सर्च’ मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक चारचाकी व दुचाकी वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. या उपाययोजनांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट या सार्वजनिक ठिकाणी उशिरापर्यंत कोणताही गोंधळ झाला नाही.

घरातच आनंदोत्सव

अनेक नागरिकांनी यंदा घरगुती पद्धतीने नववर्ष साजरे केल्याचे दिसून आले. कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात रात्री साडेदहानंतर गर्दी कर्मी होती. भद्रकाली, अंबड, सातपूर व पंचवटीतील आस्थापना वेळेत बंद झाल्याने पहाटे दीड-दोननंतर बंदोबस्ताचा ताण कमी झाला. शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये बंदोबस्ताचा टास्क राबवण्यात आला.

बंदोबस्त असा

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पाट्र्यांना परवानगी
  • मद्यपींसाठी एकदिवसीय परवाने
  • फार्महाऊस, रिसॉर्ट व हॉटेल्सची तपासणी
  • दामिनी व निर्भया मार्शल्सची गस्त
  • ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ संशयितांची थेट रुग्णालयात तपासणी
  • हुल्लडबाजी व आक्षेपार्ह वर्तनावर तत्काळ कारवाई

फौजफाटा होता तैनात

शहर पोलीस : ३ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक आयुक्त, ४६ निरीक्षक, १५८ सहाय्यक व उपनिरीक्षकांसह सुमारे ३ हजार अंमलदार
ग्रामीण पोलिस : २ अपर अधीक्षक, ८ उपविभागीय अधिकारी, २ हजार अधिकारी व कर्मचारी
अतिरिक्त पथके : वाहतूक, गुन्हे शाखा, दामिनी निर्भया, बीट मार्शल्स, जलद प्रतिसाद पथक, गुंडा, अमली पदार्थ व दरोडाविरोधी पथके

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘महसूल’चा सुधारित आकृतीबंध मंजूर

0
मुंबई, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. या...