Sunday, May 3, 2026
HomeनाशिकNashik News : विशेष सुरक्षा विभागाला नापसंती; प्रतिनियुक्तीकडे पाठ, अर्जाकरिता दुसऱ्यांदा मुदतवाढ

Nashik News : विशेष सुरक्षा विभागाला नापसंती; प्रतिनियुक्तीकडे पाठ, अर्जाकरिता दुसऱ्यांदा मुदतवाढ

नाशिक | भारत पगारे | Nashik

नेते, मंत्री, अधिकारी, पदाधिकारी व उद्योजकांच्या खासगी व सरकारी सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या विशेष सुरक्षा विभागात (विसुवि) कर्तव्य निभावण्यासाठी राज्यातील अनेक पोलिसांनी (Police) प्रतिनियुक्तीनुसार नापसंती दर्शविल्याचे समोर येत आहे. कारण महिनाभरापूर्वीच ४१० अधिकारी व ४३० अंमलदारांच्या प्रतिनियुक्तीबाबत अर्ज मागवूनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून प्रतिसाद मिळत नसल्याने जाण्यास राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाने दुसऱ्यांदा (एसआयडी) अर्जाकरिता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या विभागात नोकरी (Job) करण्यास अंमलदार नाक का मुरडत आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाचे (Security Department) तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याआधी प्रतिनियुक्ती निवड प्रक्रियेसंदर्भातील आदेश जारी केले होते. आता उपअधीक्षक विश्राम अभ्यंकर यांनी १९ ते २७ जुलैपर्यंत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. शिंदे यांनी देखील काही १८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, अर्जांना फार कमी प्रतिसाद मिळाला आहे.

विशेष सुरक्षा विभागात (Special Security Department) राज्यात ४१० निःशस्त्र अधिकारी नेमण्यात येणार आहेत. त्यामध्ये १९ पोलिस निरीक्षक, ३४ सहाय्यक निरीक्षक आणि ३५७ उपनिरीक्षकांचा समावेश असणार आहे. दरम्यान, निकषात बसणाऱ्या पोलीस अंमलदारांसह अधिकाऱ्यांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज दाखल केल्यावर शारीरीक चाचणी पोलिसांना पूर्ण करावी लागेल. त्यानंतर पात्र अर्जदारांना प्रशिक्षण देत परीक्षा घेतली जाईल.

दरम्यान, यानंतर एखादा अर्जदार (Applicant) अनुत्तीर्ण झाल्यास त्याची प्रतिनियुक्ती रद्द केली जाईल. त्यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षेत पोलीस अंमलदारांनी अर्ज नोंदणी सुरू केली आहे. इच्छुकांना https://mhpolice.pristineportal.net/ या लिंकवर अर्ज सादर करण्याचे निर्देश राज्य गुप्तवार्ता विभागाने (State Intelligence Department) दिले आहेत. विशेष म्हणजे, ही नियुक्ती केवळ पाच वर्षांसाठीच राहणार आहे.

कारण उलगडेना

सन २०२२ मध्ये राज्यात ३५९ निःशस्त्र अधिकारी नेमण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सात पोलीस निरीक्षक, १२ सहाय्यक निरीक्षक आणि ३४० उपनिरीक्षकांची पदे होती. मात्र, अनेकांनी या भरतीकडे पाठ फिरवल्याने पदे रिक्त होती. आता तेव्हाची स्थिती सन २०२५ मध्ये जाहीर झालेल्या प्रतिनियुक्तीनंतर जाणवत असून, यावेळीही पदे रिक्त राहण्याची दाट शक्यता आहे.

रिक्त पदे

घटक हवालदार नाईक शिपाई
नाशिक शहर
नाशिक ग्रामीण
अहिल्यानगर
धुळे
राज्य राखीव गट. ६ (धुळे)
एकूण १०
घटक हवालदार नाईक शिपाई
मुंबई ९२ ३० १६७
पुणे १२ ५२
नाशिक १०
जळगाव
छत्रपती संभाजीनगर
नांदेड
नागपूर १६ १४
अहेरी
एकूण १३३३६ २६१

ताज्या बातम्या

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला...