Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमNashik News : सायबर सूत्रधार मोकाटच; नाशकातील दोन गुन्ह्यांची उकल

Nashik News : सायबर सूत्रधार मोकाटच; नाशकातील दोन गुन्ह्यांची उकल

संशयित बँक खातेदार ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘होम अरेस्ट’, सायबर फ्रॉड व फॉरेक्स ट्रेडिंगसह मनी लॉन्ड्रिंगच्या बतावणीसंदर्भात नाशिक शहरात दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) तपासास आयुक्तालयाने प्राधान्य दिले आहे. मागील वर्षी दाखल झालेल्या १०० गुन्ह्यांपैकी काहींचा तपास झाला असून अन्य गुन्हे रखडलेले आहेत. तर, सन २०२५ या नववर्षात (New Year) दाखल झालेल्या अर्धा डझन गुन्ह्यांच्या तपासास पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) प्राथमिकता दिली आहे. सरत्या वर्षातील एक आणि नववर्षाच्यासुरुवातीस दाखल एक असे दोन गुन्हे मागील आठवडाभरात उघड करण्यात नाशिक शहर सायबर पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

सध्या या गुन्ह्यांचा (Crime) सखोल तपास सुरु आहे. त्यातून पुढील काही लिंक मिळविण्यावर भर दिला जात आहे. देश- विदेशातील सायबर चोरटे आणि हॅकर्सने चर्क फ्रॉम होम, शेअर ट्रेडिंग व मार्केटमधील जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक तसेच मनी लॉन्ड्रिंग केल्याचा दावा करत अटकेची भीती दाखवून शहरातील शेकडो तरुण आणि वयोवद्ध व्यावसायिक, डॉक्टर, सीए व उद्योजकांकडून १८ कोटींहून अधिकची रक्कम उकळली आहे. त्यानुसार गुन्हा घडल्यानंतर अनेक दिवसांच्या अंतराने फसवणूक व आयटी अॅक्ट कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

यात फिर्याद (FIR) दाखल होण्यापूर्वी व प्राथमिक तक्रारीनुसार प्राथमिक तपास सुरु करण्यात आला असता, अनेक गुन्ह्यांत उकळेले कोट्यवधी रुपये चोरट्यांनी बनावट बँक खात्यांसह काही संशयित खातेदारांना रक्कम वर्ग करून देण्याच्या मोबदल्यात टक्केवारीनुसार पैसे दिल्याचे उघड झाले. तर, अनेक प्रकरणांत तक्रारदाराने रक्कम संशयित बँक खात्यात वर्ग करताच अवघ्या १५ ते २० मिनिटांत कोट्यवधी रुपये २०० पेक्षा जास्त विविध बोगस व बनावट बँक खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, त्यामुळे २०० बँक खात्यांची पडताळणी तत्काळ शक्य होत नसल्याने व काही राष्ट्रीयीकृत बँकाकडून पोलिसांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक गुन्ह्यातील अपहार केलेली रक्कम परत मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे चऱ्याच गुन्हाांचे तपास रखडले आहेत. विशेष म्हणजे सायबर चोरट्यांनी हे गुन्हे करताना प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतानाच नोएडा, दिल्ली, झारखंड, जम्मू, कोईम्बतूर, मुंबई व बेंगलोरसह अन्य राज्यांतून आधुनिक सेटअप, पोलिसी भाषेतह म्बॅन्यूअलचा अभ्यास करून सायबर गुन्हेगारीच्या कारवाया सुरु ठेवल्याचे उघड झाले आहे.

लोकेशन बदलाने गडबड

होम अरेस्टची भीती दाखवून नाशिक शहरातील वयोवृद्ध महिलेला सायबर चोट्यांनी २३ लाख रुपयांना गंडा घातला होता. नाशिक शहर सायबर पोलिसांनी तपास करत ज्या बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर झाले, त्या उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील बापलेक असलेल्या बँक खातेदारांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर, दोघांचा ताबा इंदूर पोलिसांकडून घेतला. चौकशीत बापलेकांनी मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले. हा सूत्रधार जम्मू येथील असल्याचे उघड झाल्यावर ट्रॅपही लावण्यात आला. मात्र, तो हाती लागला नाही. दरम्यान, नुकत्याच ९४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पैसे वर्ग झालेल्या मुंबईतील दोघा अकाउंट होल्डरला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याही मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु झाला आहे. तपास पथक नुकतेच मुंबईतून नाशकात परतले आहे.

मुद्दे

नोएडा, जम्मूतून साखळी पद्धतीने ऑपरेटिंग
गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त; उकल कासवगतीने
आतापर्यंत २० लाखांहून अधिक रुपये गोठविण्यात यश
मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात तांत्रिक अडचणी
वारंवार ठावठिकाणा, लोकेशन बदलल्याने अपयश
सराईतांचा आवाका देशासह परदेशात

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या