नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील (Nashik City) विविध भागांत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या कोट्यवधींच्या भूखंडांवर (Possession) इतरांनी विविध प्रकारे कब्जा केला असून त्यांना मुक्त करून मनपा पुन्हा त्यांचा ताबा घेणार आहे. यासाठी मनपाचे अतिक्रमण विभाग (Encroachment Department) ॲक्शन मोडवर आले असून लवकरच विशेष मोहीम राबवून भूखंड मोकळे केले जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) मालकीचे शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी मोकळे भूखंड पडून आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यांना मोकळे करण्याची मोहीम आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही विभागीय कार्यालयांना देखील अतिक्रमणाने वेढा घातल्यामुळे आता मनपा प्रशासन जागे झाले आहे. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर तसेच नाशिकरोड विभागीय अधिकाऱ्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने उपायुक्त मयूर पाटील यांनी पत्र देऊन महापालिकेच्या भूखंडांवर ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले असेल किंवा अनधिकृत बांधकाम करून कब्जा झालेला असेल त्यांची सविस्तर माहिती गोळा करून त्याचा संपूर्ण अहवाल मुख्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार मुख्यालयातून अशा ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या हक्काच्या व स्वतः मालकीच्या नाशिक शहरात अनेक ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. त्याचा वापर होत नसल्यामुळे त्या तसेच पडून आहे. म्हणून त्याच्यावर अनधिकृत कब्जा होत आहे. त्यामुळे कोट्यवधी (Crores) रुपयांची भूखंड महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली आहे. त्यांना मोकळे करून त्यांचा उपयोग महापालिका आता करून घेणार आहे तसेच उत्पन्न वाढीसाठी देखील मोठे पाठबळ महापालिकेला मिळणार आहे.
विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे ठिकाणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. लक्करच त्या ठिकाणी मी स्वत, जाऊन पाहणी करून नोटिसा देण्यात येतील. त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेतले तर चांगले होईल अन्यथा आम्ही कारवाई करून मनपाचे मालकीचे भूखंड ताब्यात घेणार.
मयूर पाटील, अतिक्रमण उपायुक्त
या जागांच्या फायली तयार
१) नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयाच्या फाटकापासून संपूर्ण परिसरात अनधिकृतपणे बाजार भरत आहे.
२) जेहान सर्कल येथील एका मोठ्या महापालिकेच्या ओपन स्पेसवर अनधिकृत कब्जा झाला आहे.
३) द्वारका पोलीस चौकी मागील सुलभ शौचालयाच्या मागे मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.
४) नाशिकरोड विभागातील रेल्वे फाटक कदम कंपाऊंडच्या परिसरातील एक रस्ताच बंद करण्यात आला आहे.
५) पंचवटी विभागातील एका ठिकाणी तर थेट रस्त्यावर अनधिकृत गोठा बांधण्यात आला आहे.
६) पाथर्डी फाटा येथील महापालिकेच्या खुल्या जागेवर एका व्यक्तीने कब्जा केला आहे.
७) नाशिकरोड भागातील जेलरोड परिसरातील एका मोठ्या भूखंडावर देखील अतिक्रमण झाले आहे.