Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik News : पंचायत समिती सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nashik News : पंचायत समिती सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील पंचायत समिती (Panchayat Samiti) सभापतीपदांचे आरक्षण (Reservation) कधी निघणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर आज सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

यामध्ये सर्वसाधारण (खुले) १ तर सर्वसाधारण महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता २ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ सभापतीपद आरक्षित झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) पत्रानुसार सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि विमुक्त जाती व भटक्या जमातीतील महिलांसह) राखीव जागांचा समावेश आहे.

असे आहे पंचायत समितीनिहाय आरक्षण

१) अनुसूचित जमाती – कळवण

२) अनुसूचित जमाती – सुरगाणा

३) अनुसूचित जमाती स्त्री – पेठ

४) अनुसूचित जमाती स्त्री – त्र्यंबकेश्वर

५) अनुसूचित जमाती स्त्री – दिंडोरी

६) अनुसूचित जाती स्त्री – इगतपुरी

७) अनुसूचित जमाती – निफाड

८) अनुसूचित जमाती – नाशिक

९) अनुसूचित जमाती स्त्री – मालेगाव

१०) नागरिकांचा मागास प्रवर्ग – बागलाण

११) नागरिकांचा मागास प्रवर्ग – येवला

१२) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- देवळा

१३) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री – चांदवड

१४) सर्वसाधारण – सिन्नर

१५) सर्वसाधारण स्त्री – नांदगाव

ताज्या बातम्या

Tribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट...

0
नाशिक | Nashik आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी मंत्र्यांसह मुख्य सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...