Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : शिरवाडे ते धामोरी दरम्यानच्या पुलावर भूत दिसल्याची अफवा

Nashik News : शिरवाडे ते धामोरी दरम्यानच्या पुलावर भूत दिसल्याची अफवा

शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade Wakad

धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर (Shirwade and Dhamori Road) नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले व भुताने (Ghost) त्या चालकाला मारहाण (Beating) केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालु झाली आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार नसून अंनिसचे कार्यकर्ते आमावस्येच्या दिवशी तेथे राहून दाखवणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णाजी चांदगुडे यांनी दिली.

- Advertisement -

भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहे. चित्रफीतमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे. वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भिती वाटायला लागली आहे. दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. जगामध्ये भूत अस्तित्वात नसते. तरीही त्याची भिती दाखवली जाते कारण, भूत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

दरम्यान, सदरच्या फोटोचे (Photo) निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते.सदर चित्रफीत व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखविणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भुताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल. भिती वाटणार्‍या लोकांच्या मनातील भुताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहे. शिवाय शाळेमधुनही विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणार आहे. त्यामुळे भुत निघाले ही अफवा असुन रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे चांदगुडे यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...