Friday, July 24, 2026
Homeमुख्य बातम्याSambhaji Bhide : सर्वधर्म समभाव मानणे म्हणजे नीचपणा - संभाजी भिडे

Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव मानणे म्हणजे नीचपणा – संभाजी भिडे

'त्या' वादग्रस्त विधानाचाही केला पुनरुच्चार

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

सर्वधर्म समभाव म्हणजे भारतमातेच्या पोटच्या पोरांनी भारत मातेच्या भवितव्याशी केलेला व्यभिचारच. सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे नीचपणा, षंढपणा, ढोंगीपणा आहे. असे प्रतिपादन संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन विषयावर बोलत होते.

- Advertisement -

हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण भिडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, “आपले हिंदूराष्ट्र आहे, आपल्या अंतकरणात देशभक्ती ठेवून हिंदू राष्ट्रासाठी आपण जगले पाहिजे, देव, देश, धर्म यासाठी लढले पाहिजे. देशाची एकात्मतेचे प्रतीक असलेला भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवण्यासाठी वसुधैव कुटुंबकम ही जीवन पद्धती स्वीकारत प्रयत्न केले पाहिजे”, असेही भिडे यांनी म्हटले.

राणेनगर परिसरात (Rane Nagar Area) श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्यातर्फे ५१ फूट हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून साधू महंत व संभाजी भिडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजक सागर देशमुख, डॉ. चैतन्य देवरे, मनोज राजवाडे, विशाल रहाणे यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) व छत्रपती संभाजी महाराजांनी परिस्थिती समोर हताश होणारा समाज नाहीतर, परिस्थिती समोर संघर्ष करणारा, लढणारा समाज निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी हिंदुस्तानशी असलेले नाते सोडता कामा नये, असेही संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितले.

वादग्रस्त विधानाचा पुनरुच्चार

नाशिकमध्ये (Nashik) काही वर्षांपूर्वी भिडे यांनी एका कार्यक्रमात आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात असे विधान केले होते. या विधानानंतर राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. याच वाक्याचा पुनरुच्चार संभाजी भिडे गुरुजी यांनी राणेनगर येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा केला. त्यामुळे पुन्हा एकदा भिडे गुरुजींच्या या वादग्रस्त विधानाची आठवण उपस्थितांना झाली.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...