Tuesday, September 8, 2026
Homeनाशिक​Nashik News : सारडा सर्कल लवकरच होणार खुला; 'एनएचएआय'कडून हलक्या वाहनांसाठी चाचपणी

​Nashik News : सारडा सर्कल लवकरच होणार खुला; ‘एनएचएआय’कडून हलक्या वाहनांसाठी चाचपणी

द्वारका, वडाळा नाक्यावरील कोंडी फुटणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रेट सेप्रेटरच्या कामामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेला सारडा सर्कलचा (Sarda Circle) मार्ग पुढील काही दिवसांत हलक्या वाहनांसाठी अंशतः सुरू होण्याची चिन्हे आहेत. ‘न्हाई’ (NHAI) यंत्रणेने सारडा सर्कल येथून ५ ते ७ मीटर अंतराचा तात्पुरता रस्ता बनवून हलकी वाहतूक सुरू करण्याची चाचपणी केली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे वडाळा नाका आणि द्वारका परिसरावर (Wadala Naka and Dwarka Area) पडणारा वाहनांचा अतिरिक्त ताण लक्षणीयरीत्या कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) द्वारका सर्कल येथे ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम वेगाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी कामाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सारडा सर्कल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्याचा थेट आणि अतिरिक्त ताण वडाळा नाका आणि द्वारका चौकावर (Dwarka Chowk) पडत आहे. परिणामी, या दोन्ही महत्त्वाच्या चौकांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र बुधवारी (दि. २४) पाहायला मिळाले. सारडा सर्कल मार्ग पूर्णपणे बंद असल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक सध्या वडाळा नाक्यावरून वडाळागाव, द्वारका व मुंबई नाक्याकडे वळवण्यात आली आहे. यामुळे वडाळा नाक्यावर वाहनांचा भार कमालीचा वाढला असून हा परिसर पूर्णपणे ‘पॅक’ झाला आहे. त्यातच धुळे बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणारी हलकी दुहेरी वाहतूकही आता द्वारका सर्कलवरून धावत असल्याने कोंडीत भर पडली आहे.

​वाहनचालक हवालदिल

​बुधवारी दुपाली द्वारका चौक आणि वडाळा चौफुला येथील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. सारडा सर्कल बंद असल्याने उर्दू हायस्कूलमार्गे मुंबई नाका, वडाळागाव आणि द्वारकेकडे ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी अधिकच जटील बनली. तासनतास वाहने खोळंबल्याने वाहनचालक हवालदिल झाले होते. या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन मोठ्या संख्येने नियुक्त असूनही, वाहनांचा अथांग ओघ सांभाळताना यंत्रणेची दमछाक झाली.

तोडगा काय? ५ ते ७ मीटरचा तात्पुरता रस्ता!

​या कोंडीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी आता वाहतूक पोलीस आणि ‘एनएचएआय’ने सुवर्णमध्य शोधला आहे. सारडा सर्कल येथे सारडा सर्कल ते कावेरी हाॅटेललगत ५ ते ७ मीटर अंतराचा एक तात्पुरता ‘बायपास’ रस्ता तयार केला जाईल. या तात्पुरत्या मार्गावरून केवळ दुचाकी आणि चारचाकी सारख्या हलक्या वाहनांना सोडण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वडाळा नाका आणि द्वारका चौकातील ५० टक्के कोंडी जागेवरच फुटणार आहे. पुढील काही दिवसांत यावर शिक्कामोर्तब होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दोन लाचखोर सरकारी सेवकांना कारावास; कर्मचाऱ्यांसाठी इशारा

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik  शासकीय कामात लाचखोरी करून नागरिकांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणणारा निर्णय नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District and Sessions...