कोहोर | वार्ताहर | Kohor
महाराष्ट्र व गुजरात सरहद्दीवरील पेठ तालुक्यातील शिवशेत आंबे या दुर्गम, बहुल आदिवासी (Tribal) पाड्याचा युवक प्रकाश सिताराम भोये यांनी सन २०२२ ते २०२४ य कालावधीत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत (Exam) पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली असून, तालुक्यात त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
पेठ (Peth) सारख्या बहुल आदिवासी भागात अनेक भौतिक सुविधांची उणीवा असतांना देखिल प्रकाश याने मेहनत, चिकाटी, धैर्य आणि ध्येय यांच्या जोरावर पदवीधर पर्यंत शिक्षण घेतले. आपणही शासकीय अधिकारी व्हायचं, हे स्वप्न उराशी बाळगून काम करत स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू ठेवली. आणि अभ्यासात सातत्य ठेवून मेहनतीच्या जोरावर त्याने यश संपादन केले.
दरम्यान, प्रकाश भोये (Prakash Bhoye) यांचे वडील हे शेती करतात. तर आई मुख्यसेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. मुलांने प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करत मिळविलेल्या यशाचे आई-वडिलांना आंनद झाला. एमपीएससीकडून नुकतेच पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये त्याला यश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.