Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात सहा रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; मृत्यू झालेली संशयित व्यक्ती निघाली करोना...

नाशिक शहरात सहा रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; मृत्यू झालेली संशयित व्यक्ती निघाली करोना बाधित; अशी आहे हिस्ट्री

नाशिक शहरात आज सायंकाळी आलेल्या अहवालात सहा रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज एकूण २८ रुग्ण वाढले आहेत.  यामध्ये शहरातील सहा तर इतर २२ रुग्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आहेत. सर्वाधिक रुग्ण आज मनमाड शहरातून बाधित आढळून आले आहेत.

आज शहरातील वाढलेल्या रुग्णांमुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्या २५६ वर पोहोचली आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ६३ वर पोहोचली आहे. शहरात आतापर्यन १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ९३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

- Advertisement -

आज आढळलेल्या रुग्णांची हिस्ट्री 

१) उत्तम नगर सिडको येथील ५२ वर्षीय व्यक्ती व २२ वर्षीय युवक या पिता पुत्राचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

२) गिताई बंगलो,हॉटेल मागे नाशिक येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जुन्या रुग्णाच्या संपर्कातील ही व्यक्ती आहे.

३) कर्मा हाईट्स,प्लॉट क्रमांक ५ तपोवन रोड नाशिक येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा प्राप्त झाला आहे. हा रुग्णदेखील  जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे

४) प्रज्ञा सोसायटी,कोणार्क नगर,दत्त मंदिर,आडगाव शिवार येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित आलेला आहे.

५) कलानगर येथील प्लॉट क्रमांक ८६ कुबेर बंगलो, नाशिक येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

६) समता नगर टाकळी येथील ५५ वर्षीय व्यक्ती वर दि ३१/०५/२०२० पासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचे दि.२/०६/२०२० रोजी सकाळी निधन झाले होते. या व्यक्तीचा करोना अहवाल बाधीत असल्याचा अहवाल काल दि २/०६/२०२० रोजी सायंकाळी प्राप्त झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या