नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Nagarparishad and Nagarpanchyat Election) आज (दि.२) रोजी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सरुवात झाली आहे. २६६ नगरसेवकपदांसाठी १,०२८ तसेच ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. ४१६ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडत असून, जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७२ हजार ५४३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे.
यानंतर आता सकाळी ९.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची (Voting) आकडेवारी समोर आली आहे. यातील पिंपळगाव बसवंत ८.८२ टक्के, मनमाड ५.३० टक्के, भगूर ७.८० टक्के, नांदगाव ३.३७ टक्के, सिन्नर ६.६७ टक्के,सटाणा ९.१३ टक्के, येवला ४.०५ टक्के, त्र्यंबकेश्वर १३.३५ टक्के, इगतपुरी ७.३३ टक्के, ओझर ५.२७ टक्के, चांदवड ८.५६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सुरुवातीच्या दोन तासांत त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक १३.३५ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान नांदगावमध्ये ३.३७ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९ टक्के मतदान झाले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत हा मतदानाचा आकडा किती पोहचतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्मात एकही मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आलेले नसले, तरी मतदान व मतमोजणीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस (Police) प्रशासनाने केले आहे.तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.




