Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याला तडा - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद...

Nashik News : महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याला तडा – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

आंबेदिंडोरी | वार्ताहर Aambe Dindori

सामाजिक ऐय जपणार्‍या महाराष्ट्रात आज ची परिस्थिती विदारक झाली आहे. सामाजिक ऐक्याची वीण तुटली जात असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना सर्वांनी सामाजिक एकोपा राखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन केले. दिंडोरी तालुयातील आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

पुढे बोलताना पवार म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय जवळचे म्हणून दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती, दादासाहेबांचे राज्यासाठी आणि देशासाठी मोठं योगदान होते,त्यांनी समाजातील दिन दलितांच्या, भूमिहीन, उपेक्षितांच्या उद्धारासाठी मोठे काम उभे केले, यशवंतराव चव्हाणांसोबतही त्यांनी काम केले पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली मात्र त्यांनी ती नाकारली असे त्यागी वृत्तीचे दादासाहेब होते यांच होते. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करावे असे सांगतानाच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवन चरित्राचा इतिहास कथन करताना त्यांचे एकसष्टी कार्यक्रम नाशिकला झाल्याचा उल्लेख करत त्यावेळच्या नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा आवर्जून उल्लेख केला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सदर स्मारक लोकार्पण जरी उशिरा झाले तरी ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना अभिप्रेत असलेल्या शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणार्‍या शरद पवार यांचे हस्ते झाले असल्याचे सांगितले प्रास्ताविक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी केले तर यावेळी खासदार भास्कर भगरे, निलेश लंके, आमदार शशिकांत शिंदे कादंवा चे चेअरमन श्रीराम शेटे,शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे, दादासाहेब गायकवाड यांचे पणतू सागर गायकवाड, आनंदराव गायकवाड यांची भाषणे झाली.

आभार शाम हिरे यांनी मानले यावेळी जिप माजी अध्यक्ष विद्याताई पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, माजी जिप गटनेते प्रविण जाधव, गोकुळ पिंगळे आदिसह विविध मान्यवर सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी संचालक मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....