Wednesday, April 29, 2026
HomeनाशिकNashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

Nashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

जनगणनेचे प्रात्यक्षिक (Census Demonstration) करण्यासाठी कर्मचारी दिंडोरी शहरातील घरोघरी जात असून प्रात्यक्षिकांमुळे दिंडोरी शहरात (Didnori City) सुध्दा जनगणनेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. २०११ नंतर सुमारे १६ वर्षांनंतर जनगणना होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

सध्या दिंडोरी शहरात प्रशिक्षण वर्ग सुरु आहे. प्रांत अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे, तहसिलदार मुकेश कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना, सरकारी नोेकरदार वर्गाला जणगणना कशी करावी, कसे प्रश्‍न विचारावे, माहिती कशी भरावी, अ‍ॅपलोड कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ करीत आहे. त्यानुसार गावोगावी जनगणना करतांना अडचणी येवू नये, प्रत्यक्षात काम करताना कशा पध्दतीने काम करावे, हे समजून घेण्यासाठी व प्रश्‍न तयार झाल्यास तत्काळ सोडवण्यासाठी कर्मचार्‍यांना दिंडोरी शहरातील विविध भागात पाठवण्यात आले.

या कर्मचार्‍यांनी (Worker) दिंडोरी शहरातील विविध वस्त्यामध्ये जावून माहिती घेतली. त्यामध्ये नागरिकांना प्रश्‍न विचारले. त्यामध्ये घरातील महिला पुरुष संख्या, घरातील पंखा, गाडी आदी वस्तूंची माहिती विचारली. कामाबद्दल माहिती घेतली. जातीची माहिती घेतली. हे प्रात्यक्षिक असले तरी नागरिकांमध्ये (Citizen) उत्साह निर्माण झाला. नागरिकांनी चांगली उत्तरे दिली. दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी कर्मचारी व नागरिक यांच्याशी संवाद साधला. पुढील काळात समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले. कर्मचार्‍यांनींही उत्साहाने प्रश्‍न विचारुन उत्तरे भरुन घेतली. कर्मचार्‍यांमध्ये उत्साह दिसून आला.

ताज्या बातम्या