Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik News : विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गावागावात जनसंपर्क; पालकांच्या...

Nashik News : विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गावागावात जनसंपर्क; पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत समुपदेशन

नाशिक | Nashik

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर, ता. कळवण येथील विद्यार्थ्यांची (Student) शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी (Teachers and Staff) गावागावात जाऊन विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत समुपदेशन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत (School) पाठविण्याबाबत पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना आजपासूनच शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.

- Advertisement -

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षणाचे महत्त्व, आश्रमशाळेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांची माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. यावेळी पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात असून, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे अनेक पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. शाळेतील शिक्षक व कर्मचारी ‘विद्यार्थी हेच केंद्रबिंदू’ मानून विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्यांची शैक्षणिक प्रगती सुरू राहावी आणि आश्रमशाळेवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. गावागावात जाऊन पालकांशी थेट संवाद साधल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून, पालक-शाळा यांच्यातील संवादही अधिक मजबूत होणार आहे.

पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या समुपदेशनानंतर “आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवू,” अशी भूमिका अनेक पालकांनी (Parents) व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना आजपासूनच शाळेत पाठविण्याची तयारी पालकांनी दर्शविली आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील पालकांकडून कौतुक होत असल्याचेही प्रकल्पाधिकारी डाॅ. संखे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने पावले उचलली आहेत. गुन्ह्यातील...